सौरऊर्जा प्रकल्पामधून महावितरणलाही वीज

By Admin | Published: November 28, 2015 12:42 AM2015-11-28T00:42:17+5:302015-11-28T00:47:06+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पातून महावितरणलाही वीज देण्यात येणार आहे.

Mahavitaran also got electricity from solar power projects | सौरऊर्जा प्रकल्पामधून महावितरणलाही वीज

सौरऊर्जा प्रकल्पामधून महावितरणलाही वीज

googlenewsNext


औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पातून महावितरणलाही वीज देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळावरील विजेची गरज भागविण्याबरोबर महावितरणलाही वीज मिळणार असल्याने पर्यायाने शहरातील वीजपुरवठ्यासही हातभार लागणार आहे.
चिकलठाणा विमानतळावर रेल्वे रुळाच्या बाजूने असलेल्या १७ एकर जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ३ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. विमानतळावर आजघडीला १ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यामुळे २ मेगावॅट वीज महावितरणला देण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विमानतळाला लाखो रुपयांचे येणारे बिल थांबेल आणि त्यातून आर्थिक बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
सध्या दर महिन्याला प्राधिकरणाला ४१ लाख रुपये इतके वीज बिल महावितरणला अदा करावे लागते.
यामुळे विमानतळाची विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. दर महिन्याला जवळपास ६ लाख युनिटची गरज या प्रकल्पातून प्राधिकरण भागविणार आहे.
विमानतळावर १७ एकर जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत महावितरणबरोबर चर्चा सुरू आहे.
विमानतळाच्या विजेची गरज भागविण्याबरोबर या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणलाही देण्यात येणार
आहे,

Web Title: Mahavitaran also got electricity from solar power projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.