महावितरण गाफील; दिवाळी अंधारात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:05 AM2017-10-15T01:05:31+5:302017-10-15T01:05:31+5:30

महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे दिवाळीसारखा सण पणतीच्या उजेडात साजरा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. दिवाळीत अंधार राहणार नाही, या दृष्टिकोनातून महावितरणकडून कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे.

 Mahavitaran careless; Diwali in darkness? | महावितरण गाफील; दिवाळी अंधारात ?

महावितरण गाफील; दिवाळी अंधारात ?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे दिवाळीसारखा सण पणतीच्या उजेडात साजरा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. दिवाळीत अंधार राहणार नाही, या दृष्टिकोनातून महावितरणकडून कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या गाफील कारभारामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून सर्व रोहित्रांची पहाणी करुन त्याची दुरुस्ती केली जाते. यासाठी साहित्यांची ज्या त्या कार्यालयाकडून मागणी केली जाते. मात्र, या वेळी दिवाळी हा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही महावितरणकडून यासंदर्भात कारवाई केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या घरी आनंद घेऊन येतो. घरावर व परिसरात विद्युत रोषणाई करुन परिसर उजळतो. यामुळे वातावरण प्रसन्न होते. परंतु या वेळेस सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे. उप कार्यकारी अभियंत्यांकडून केवळ ‘वसुली’ला प्राधान्य दिले जात आहे. परंतु ग्राहकांना सुविधा देण्यात मात्र ते अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
दिवसेंदिवस महावितरणचा बेजबाबदार कारभार वाढतच चालला आहे. वरिष्ठांचे दुर्लक्षच ग्राहकांना त्रासदायक ठरण्यास कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे. जे अधिकारी आणि कर्मचारी कामचुकारपणा करतात, ग्राहकांना वेठीस धरतात परंतु त्यांना सुविधा देत नाहीत अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे, त्यांची बाजू समजू शकली नाही.

Web Title:  Mahavitaran careless; Diwali in darkness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.