महावितरण, कन्नड सुपरकिंग संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:56 AM2017-11-27T00:56:45+5:302017-11-27T00:57:05+5:30
महावितरण संघाने यजमान एमजीएम संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने आमेर क्रिकेट क्लबवर १ धावाने निसटता विजय मिळविला.
औरंगाबाद : महावितरण संघाने यजमान एमजीएम संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने आमेर क्रिकेट क्लबवर १ धावाने निसटता विजय मिळविला.
एमजीएम ट्विेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात महावितरण संघाविरुद्ध एमजीएम संघाने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत सर्वबाद ८५ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार गिरीश गाडेकरने एकाकी झुंज देताना २ चौकारांसह २५ व सागर शेवाळेने १० धावा केल्या. महावितरणकडून इनायत अली याने १२ धावांत ३ तर व्यंकटेश सोनवलकरने १० धावांत ३ बळी घेतले. शहीद सिद्दीकीने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी टार्गेट १४.४ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश सोनवणे याने ५ चौकारांसह ३५ व निशीत कंडी याने २१ धावा केल्या. एमजीएमकडून रहीम खानने ९ धावांत ३ बळी घेतले. अनंत बकाल व सागर शेवाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुपारच्या सत्रात झालेल्या लढतीत कन्नड सुपरकिंगने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११४ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने ५४ व सलमान अहमदने २८ धावा केल्या. आमेर क्रिकेट क्लबकडून अब्दुल सामीने ११ धावांत ४ गडी बाद केले. ताहेरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आमेर क्रिकेट क्लब ८ बाद ११३ धावांच करू शकला. त्यांच्याकडून कौसीन कादरीने ५७ चेंडूंत ६७ धावा केल्या. नौशाद हाश्मी व खालेद कादरी यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. कन्नड सुपरकिंगकडून भावेश पटेलने २० धावांत ३ गडी बाद केले. सलमान अहमद, आशिष मोरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात अंकुर देशपांडे, गंगाधर शेवाळे व राजकुमार कंगले यांनी पंचांची कामगिरी केली. गुणलेखन राजकुमार तेवर याने केले. उद्या, सोमवारी सकाळी ८.१५ वाजता अश्वमेध क्रिकेट क्लब वि. यंग इलेव्हन ‘ब’ व दुपारी १२.३० वाजता कन्नड सुपरकिंग वि. अलॉफ्ट लायमर यांच्यात लढती होणार आहेत.