महावितरणलाही अवकाळीचा तडाखा
By Admin | Published: March 17, 2017 11:57 PM2017-03-17T23:57:30+5:302017-03-17T23:58:42+5:30
बीड : दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये उच्च दाब, लघु दाब वाहिनीवरील विद्युत खांबांची पडझड झाली
बीड : दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये उच्च दाब, लघु दाब वाहिनीवरील विद्युत खांबांची पडझड झाली असून, रोहित्रांमध्येही बिघाड झाला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सातत्याने वीज पुरवठा खंडित ठेवावा लागत आहे.
बीड विभागाचे अधिक नुकसान झाले असून, विभागात उच्च दाबवाहिनीवरील ४८, तर लघुदाब वाहिनीवरील १२५ खांब उन्मळून पडले आहेत. शिवाय, चार रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात अनियमित वीजपुरवठा होत आहे. उच्च दाब वाहिनीवरील दुरुस्तीची कामे महावितरणने हाती घेतली आहेत. अंबाजोगाई विभागात अधिकचा पाऊस होऊनही कमी नुकसान झाले आहे. केवळ परळी आणि तेलगाव उपविभागात उच्च दाबवाहिनीवरील ८, तर लघुदाबवाहिनीवरील २६ खांबांचे नुकसान झाले आहे, तर ४ रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)