महावितरणने घेतला ताबा

By Admin | Published: November 16, 2014 12:13 AM2014-11-16T00:13:43+5:302014-11-16T00:38:43+5:30

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती.

Mahavitaran took control | महावितरणने घेतला ताबा

महावितरणने घेतला ताबा

googlenewsNext

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती. शहरातील वीजपुरवठा १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतरित करण्यात येणार होता; पण शहरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे शनिवारी जीटीएलने वीजपुरवठ्याचे हस्तांतरण महावितरणकडे केले. आता शहरात वीजपुरवठा महावितरण करणार आहे.
२०११ मध्ये महावितरणने शहरातील वीजपुरवठा जीटीएलकडे हस्तांतरित केला होता. शहरातील ग्राहक जीटीएलच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते. जीटीएलच्या तक्रारीबरोबर थकबाकीही वाढली होती. कंपनीने महावितरणचे वीज बिलाचे पैसे थकविल्यामुळे जीटीएलला १० नोव्हेंबर रोजी कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी कंपनीकडून अधिकृतपणे हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरणाच्या करारावर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे आणि जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारमाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. शहरातील वीजपुरवठ्यासाठी जवळपास २५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Mahavitaran took control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.