महावितरण, कम्बाइंड बँकर्स विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:20 AM2018-04-09T00:20:35+5:302018-04-09T00:21:32+5:30
एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने एमजीएम अ संघावर, एमजीएम ब संघाने राज्य परिवहन महामंडळावर, तर कम्बाइंड बँकर्सने एमजीएम ब संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज झालेल्या लढतीत दिनेश कुंटे, प्रियांक चोप्रा, शाहेद सिद्दीकी, बाळासाहेब मगर सामनावीर ठरले.
औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने एमजीएम अ संघावर, एमजीएम ब संघाने राज्य परिवहन महामंडळावर, तर कम्बाइंड बँकर्सने एमजीएम ब संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज झालेल्या लढतीत दिनेश कुंटे, प्रियांक चोप्रा, शाहेद सिद्दीकी, बाळासाहेब मगर सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात एमजीएम अ संघ १५ षटकांत ६५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अमित पाठकने एक षटकार व २ चौकारांसह १८, अमरदीप असोलकरने १0 व सागर शेवाळेने १२ धावा केल्या. महावितरण अ कडून शाहेद सिद्दीकीने ६ धावांत ३, पवन सूर्यवंशीने २१ धावांत ३ व ओमप्रकाश बकोरिया यांनी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी लक्ष्य ८ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इनायत अलीने ५ चौकार, एका षटकारासह ३१, रोहित ठाकूरने २४ धावा केल्या. एमजीएम अ कडून अब्दुल शेखने २ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात महावितरण ब ने २0 षटकांत ४ बाद १६0 धावा केल्या. त्यांच्याकडून बाळासाहेब मगरने ४६ चेंडूंत एक षटकार व ७ चौकारांसह ५२, अतिक खानने २ चौकारांसह ३९, संतोष आवळेने ४ चौकारांसह २२ व अनिकेत काळेने १२ धावा केल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन संघाकडून कलीम अहमद व नितीन दुर्वे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात राज्य परिवहन संघ ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सिद्धार्थ थत्तेकरने ३ चौकारांसह २५ व जोगिंदर तुसमकरने १0 धावा केल्या. महावितरण ब कडून पवन सरोवरने २२ धावांत ३, तर संजय बनकर व कुमार नायडू यांनी प्रत्येकी २ आणि बाळासाहेब मगरने १ गडी बाद केला.
तिसºया सामन्यात कम्बाइंड बँकर्स अ संघाने ४ बाद १६२ धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश कुंटेने ३ चौकारांसह नाबाद ४४, सय्यद जावेदने २ षटकार व एका चौकारासह २८, रवींद्र शेरेने २४ व मिलिंद पाटीलने १९ धावांचे योगदान दिले. एमजीएम अ कडून रवींद्र काळे, शेखर ताठे, सय्यद फरहान, सय्यद सैफउद्दीन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमजीएम ब संघ १४५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शेखर ताठेने एकाकी झुंज देत ४३ धावा केल्या. सय्यद फरहानने २८, प्रमोद राऊतने २७, लक्ष्मण सूर्यवंशीने २४ धावा केल्या. कम्बाइंड बँकर्सकडून दिनेश कुंटेने ३६ धावांत ४, तर सय्यद जावेदने ३ गडी बाद केले. मिलिंद पाटील व विरल शाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पंच म्हणून उदय बक्षी, महेश जहागीरदार, राजा चांदेकर, आर. नेहरी यांनी काम पाहिले.