महावितरणची अल्युमिनिअम तार लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 08:54 PM2019-06-28T20:54:14+5:302019-06-28T20:54:23+5:30
वाळूज महानगरातील खोजेवाडी शिवारातून चोरट्याने महावितरणची जवळपास २७ हजार रुपये किमतीची अल्युमिनिअम तार लांबविल्याचे गुरुवारी उघडकीस आले.
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील खोजेवाडी शिवारातून चोरट्याने महावितरणची जवळपास २७ हजार रुपये किमतीची अल्युमिनिअम तार लांबविल्याचे गुरुवारी उघडकीस आले.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोजेवाडी शिवरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने एलटी लाईन टाकली आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी येथील गट नं. ५९ मधील शेतातील ५ व गट नं. ६१ मधील शेतातून २ खांबावरील महावितरणची अल्युमिनिअमची तार लंपास केली.
या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीकांत गोरे यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.