झारीतील शुक्राचार्यांमुळे महावितरण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:41 AM2017-10-01T00:41:39+5:302017-10-01T00:41:39+5:30
संपूर्ण जिल्ह्याला वीज पुरवठा करणाºया महावितरण कंपनीतील झारीतील शुक्राचार्यांमुळे सातत्याने ही संस्था आर्थिक बोजाखाली दबत असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आर्थिक घोटाळ्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपुर्वी या विभागात मीटर रीडिंगचा घोटाळा झाला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संपूर्ण जिल्ह्याला वीज पुरवठा करणाºया महावितरण कंपनीतील झारीतील शुक्राचार्यांमुळे सातत्याने ही संस्था आर्थिक बोजाखाली दबत असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आर्थिक घोटाळ्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपुर्वी या विभागात मीटर रीडिंगचा घोटाळा झाला होता. त्यानंतर आता वीज बिलाचा घोटाळा समोर आला आहे.
संपूर्ण जिल्ह्याला वीज पुरवठा करणाºया महावितरण कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांपासून अपप्रवृत्तींचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला असून अधिकाºयांची कमी तर काही कंत्राटदारांचीच अधिक चलती असल्याचे दिसून येत आहे. या कंत्राटदारांना काही काम कामचुकार अधिकाºयांकडून पाठीशी घातले जात असल्याने आर्थिक अनियमिततेची अनेक प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये परभणी जिल्ह्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील काही प्रकरणात कारवाई झाली तर काही प्रकरणे आपसात मिटविली गेली. इन्फ्रा-२ अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही या निधीतून वेळेवर काम केले जात नाही. याचा जाबही कोणी विचारत नाही. जेथे मलिदा मिळतो तेथील कामांना प्राधान्य दिले जाते, हे सातत्याने समोर आले आहे. आर्थिक अनियमितता करणाºयांना धडा शिकविण्याऐवजी तात्पुरती कारवाई करुन वेळ निभावून नेण्याचा प्रकार सातत्याने होत आहे. जून महिन्यात परभणी शहरात मीटर रीडिंग घेण्यावरुन अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. शहरातील तिरुमला मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या अख्त्यारित असलेल्या मीटर रीडिंग घेणाºयांनी व्यावसायिक व घरगुती ग्राहकांचे कमी रीडिंग दाखवून ग्राहकाकडून ४ लाख ३९ हजार ९० रुपयांची वसुली करुन महावितरणला चुना लावला. याशिवाय मे.याम मल्टी सर्व्हिसेस या कंपनीनेही महावितरणला अशाच प्रकारे चुना लावून ४ लाख १२ हजार २५० रुपयांचे या कंपनीचे नुकसान केले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाला. आता या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन आरोपपत्र तयार केले आहे व ते न्यायालयात दाखल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आले आहे. मीटर रीडिंगच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची ही एक घटना उघडकीस आली असली तरी अशा घटना घडू नयेत, यासाठी महावितरणने काय खबरदारी घेतली, हे अद्याप उघड केलेले नाही. अशातच परभणी महानगरपालिकेच्या वतीने वीज बिलासाठी भरण्यात आलेली रक्कम खाजगी ग्राहकांच्या नावे जमा करुन ७१ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी २७ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मनपातील एका कर्मचाºयाबरोबरच महावितरणमधील एका कर्मचाºयाचा समावेश आहे. हे प्रकरण कोतवाली पोलिसांकडून आता चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले आहे. (समाप्त)