महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

By साहेबराव हिवराळे | Published: November 24, 2023 04:40 PM2023-11-24T16:40:45+5:302023-11-24T16:45:02+5:30

शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

Mahavitran cable shed; Who is responsible if things go wrong? | महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

छत्रपती संभाजीनगर :शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या लटकणाऱ्या तारांमुळे सर्वसामान्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता वाहन बाहेर गेले आहे. आल्यावर सांगतो, असे सांगतात. तोपर्यंत रस्त्यावर जिवंत तारा लोंबकळलेल्या असतात. याकडे अधिकारी लक्ष देणार कधी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

शहरात या ठिकाणी लटकलेल्या तारांचा धोका
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र चौक : विद्युत ट्रान्सफार्मरची मंजुरी व दुरुस्तीसाठी महावितरणने जबाबदारी घेऊनही सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने औद्योगिक क्षेत्रात जड वाहनावर प्रवाहित तार पडण्याची भीती आहे.
राजनगर, मुकुंदनगर : वीजपुरवठा खंडित होऊन अंधाराचे साम्राज्य पसरते. अनेकदा कळवूनही लाईनमन दुरुस्तीसाठी येतच नाही. त्यामुळे अंधारात राहावे लागते.
मिसारवाडी : उघड्या डीपींचे फ्यूज बॉक्स आणि नागरिकांना ये-जा करताना रस्त्यावर जाताना तुटलेल्या तारा पाहून जपूनच प्रवास करावा लागतो. दिवसा लक्षात येते; परंतु रात्री काही दुर्घटना झाल्यास दोषी कोण?

अशा तारांबाबत तक्रार कोठे कराल?
विद्युत तारा तुटल्या तर जवळील फ्यूज कॉल सेंटर किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती द्यावी.

‘महावितरण’चे लक्ष नाही का?
कर्मचारी वेळकाढूपणा करतात, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीआरएस लावण्यात यावा, म्हणजे कर्मचाऱ्यांची तत्परता लक्षात येईल.

नागरिक काय म्हणतात? महावितरण कार्यालयास फोन केला तरी ते कुणालाही न पाठविता झिरो लाईनमनला पाठवितात. रस्ता ओलांडून वीज जोडण्या दिल्या आहेत, काही जिवावर बेतले तर जबाबदार कोण?
- सुभाष पांढरे पाटील, नागरिक

विजेच्या तारा तुटल्याने धोका असतो. पण महावितरण नागरिकांना दाद देत नाही.
- गणेश घोडके, नागरिक

तत्काळ वीज जोडणी..
काही तक्रारी प्राप्त झाल्या की, टीम पाठविली जाते, परंतु अधिक तक्रारी असल्यास विलंब होऊ शकतो, नागरिकांनी सहकार्य करावे.
- महावितरण अधिकारी

Web Title: Mahavitran cable shed; Who is responsible if things go wrong?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.