महेश नवमी उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:35 PM2019-06-11T21:35:18+5:302019-06-11T21:35:29+5:30
येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित मंगळवारी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली.
वाळूज महानगर : येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित मंगळवारी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.
माहेश्वरी समाजात महेश नवमीला खूप महत्त्व आहे. महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मंडळ वाळूज विभागातर्फे धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सजवलेल्या रथात भगवान महेश व पार्वती माता यांची वेशभूषा केलेल्या दाम्पत्यांची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मोरे चौक येथून निघालेल्या मिरवणुकीचा मोहटादेवी मंदिर, महाराणा प्रताप चौक मार्गे वैष्णोदेवी उद्यानात समारोप करण्यात आला.
मिरवणुकीतील उंड, घोडे आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांनी नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वैष्णोदेवी उद्यानात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष ईश्वर हेडा, संतोष राठी, रमेश मुंदडा, उदय तोतला, अनिल मालपाणी, शितल मोदाणी, मनिष मुंदडा, विजय सारडा, जुगल लाहोटी, श्रीनिवास सोनी, स्वरुप लाहोटी, निलेश सोनी, ललीत बंग, विद्या सारडा, रचना मालपानी, किरण राठी, सुवर्णा मुंदडा, निता राठी, उज्वला भक्कड, मंगेश राठी, सुनिल राठी आदींसह समाज बांधव उपस्थित होते.