बोगस विमा प्रकरणातील मुुख्य आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:42 AM2017-09-29T00:42:36+5:302017-09-29T00:42:36+5:30
बनावट अपघातांद्वारे विमा लाटणाºया टोळीचा म्होरक्या तथा कंपनीच्या व्यवस्थापकास आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बनावट अपघातांद्वारे विमा लाटणाºया टोळीचा म्होरक्या तथा कंपनीच्या व्यवस्थापकास आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली.
सतीश अवचार (रा. नंदनवन कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सतीश हा खाजगी विमा कंपनीचा व्यवस्थापक होता. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर महेश मोहरीर, पोहेकॉ. आर. आर. शेख, दलाल शेख लतीफ यांना अटक केली आहे. या प्रकरणात ३८ बोगस विम्यांचे दावे न्यायालयात दाखल करून लाखो रुपये लाटले होते. न झालेल्या अपघातांचा बनावट पंचनामा पोलीस करून देत तर अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयात जखमीने उपचार घेतल्याची बनावट कागदपत्रे डॉक्टर मोहरीर तयार करीत होते. कागदपत्र तयार झाल्यानंतर दलाल लतीफ काही वकिलांमार्फत दावे दाखल करीत होता. या प्रकरणात वकिलालादेखील अटक करण्यात आली होती. दाव्यापोटी मिळालेल्या रकमा आरोपी आपसात वाटून घेत. या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी छडा लावला.