फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

By मुजीब देवणीकर | Published: May 27, 2023 01:15 PM2023-05-27T13:15:55+5:302023-05-27T13:16:18+5:30

पाणी उपसा पूर्ववत करण्यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज

main Water pipe burst again in Farola, water supply to Chhatrapati Sambhajinagar postponed by a day | फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: फारोळा येथील 100 एमएलडी पंपगृहातील जलवाहिनी फुटल्याने पंपगृहात व मोटारमध्ये पाणी गेल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. 

शहर पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच अचानक बिघाड किंवा जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आजही फारोळा येथील पंपगृहातील जलवाहिनी फुटली. यामुळे पंपगृह आणि त्यातील मोटारमध्ये पाणी गेले. कर्मचाऱ्यांनी लागलीच येथील वीज पुरवठा बंद केला. यामुळे पाणी उपसा ठप्प झाला आहे. 

दुरुस्तीला १६ तास लागणार
अचानक जलवाहिनी फुटून पंपगृहात आणि मोटारीत पाणी गेले आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, मोटारमधील पाणी काढून सर्व भाग कोरडे करणे. तसेच पुन्हा पाणी उपसा सुरु करणे यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलावे लागणार आहे.

Web Title: main Water pipe burst again in Farola, water supply to Chhatrapati Sambhajinagar postponed by a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.