मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:05 AM2017-08-31T00:05:03+5:302017-08-31T00:05:03+5:30
दासखेड येथील मतिमंद विद्यालयातील अठरा वर्षीय कर्णबधिर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथील मतिमंद विद्यालयातील अठरा वर्षीय कर्णबधिर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्याचे शव ग्रामीण रूग्णालयात आणले. विद्यार्थीयाच्या पालकास दुपारी एक वाजता पाल्य आजारी असल्याचे कळवण्यात आले. पोलिसात मात्र सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती. शवविच्छेदन न करताच शव घेऊन जाण्याची प्रक्रि या सुरू होती. वरिष्ठ पोलिस अधिकाºयांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
गणेश दिनकर घाडगे (१८ रा.वाकनाथपूर ता.जि.बीड) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. गणेश हा मुकबधिर होता. तीन महिन्यापूर्वी त्यास दासखेड येथील कै. अप्पासाहेब मुसळे मतीमंद विद्यालयात प्रवेश दिला होता. बुधवारी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास मतिमंद विद्यालयातील कर्मचारी गणेश याचे शव घेऊन ग्रामीण रूग्णालयात पोचले. रूग्णालयात कार्यरत डॉ. संकेत बाहेती यांनी पाटोदा पोलीस आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.नारायण गाडे यांना माहिती दिली. त्यांनी शवविच्छेदनासाठी नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.गणेश गुंड यांना कळवले. गुंड रूग्णालयात बारा वाजता पोचले. मात्र, पोलीस कार्यवाही काहीच झालेली नसल्याने त्यांनी शवविच्छेदन केले नाही.
नायगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश गुंड यांचा संपर्क न झाल्याने मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही.
शाळेचे अधीक्षक भागवत नवले यांनी गणेशचे वडील दिनकर घाडगे यांना मुलगा आजारी असल्याची माहिती दुपारी एक वाजता कळवली. पालक आणि नातेवाईक रूग्णालयात पोहोचल्यावर शाळेतील कर्मचाºयांनी त्यांच्याशी ‘चर्चा’ केली. पालकांनी मृतदेह शवचिकित्सा व पोलिसात नोंद न करताच घेऊन जाण्याची तयारी केली.
४सायंकाळच्या सुमारास माध्यमांनी रूग्णालयात धाव घेत हा प्रकार समोर आणला. या प्रकरणात ‘गडबड’ असल्याचा संशय आल्याने आणि स्थानिक पोलिस कायदेशीर कार्यवाही करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिजित पाटील यांच्यापर्यंत गेले.
४ पाटील यांनी स्थानिक पोलिसांना खडसावल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे गणेशच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. रूग्णालय परिसरात चर्चेला उधाण आले होते.