माजलगाव, आष्टी आगार दुपारपर्यंत बंद

By Admin | Published: October 29, 2015 12:08 AM2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:22:37+5:30

बीड : आगार पातळीवर रखडलेल्या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी जिल्ह्यातील आठही आगारांत मंगळवारी कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Majalgaon, Ashti Depot closed till noon | माजलगाव, आष्टी आगार दुपारपर्यंत बंद

माजलगाव, आष्टी आगार दुपारपर्यंत बंद

googlenewsNext


बीड : आगार पातळीवर रखडलेल्या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी जिल्ह्यातील आठही आगारांत मंगळवारी कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. माजलगाव व आष्टी हे दोन आगार दुपारपर्यंत १०० टक्के बंद ठेवल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बीडसह धारूर, अंबाजोगाई, परळी, धारूर, पाटोद्यात धरणे आंदोलन करण्यात आले. कामगार संघटनेच्या या राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
माजलगावात प्रवाशांसह
शालेय विद्यार्थी ताटकळले
आगार प्रमुखाची अरेरावी दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप करत सोमवारी आगारातील विविध संघटनेच्या ४०० कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता बंद पुकारून आगार प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी केली. या बंदमुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे हाल तर झालेच शिवाय एस.टी.महामंडळाचे लाखोंचे नुकसानही झाले. दुपारपर्यंत आगार १०० टक्के बंद होते. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कामगार संघटना, कामगार सेना, कास्ट्राईब, मनसे कामगार संघटना, इंटक (छाजेड) या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. लातूर, बीड, परभणी, गेवराई या मार्गावर जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागला. विभागीय यांत्रिकी अभियंता लांडगे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले.
गेवराईत धरणे
एस टी कामगार संघटनेच्या वतीने येथील आगारात धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व गाडयÞाची स्पीड लॉक काढण्यात यावे, पंढरपूर, मुंबई, कल्याण, भिवंडी, औरंगाबाद, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्यांना ओव्हरटाईम वाढवून देण्यात यावा, पुरूष व महिला, यांत्रिक विश्रामगृहाची स्वच्छता करावी यासारख्या मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे बंडू बारगजे, ज्ञानेश्वर चातुर, शाहुराव जाधव, संदीपान आडाळे, गणेश खेडकर, सुयोग्य दाभाडे, दीपक चौकटे, सचिन आगे, बाबा पुरी, रोहीत कांडेकर, उध्दव मचे, कचरे, तावरे, अनिल खंडागळे आदी उपस्थित होते.
आष्टीत ५४ बस जागेवर उभ्या
आंदोलनामुळे आगारातील ५४ बसेस दुपारपर्यंत आगारातच उभ्या राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विभागीय वाहतूक अधिकारी उध्दव वावरे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पुणे, मुंबई, औंरगाबाद, जळगाव येथील शेडयुलबाबत प्रशासन दिशाभूल करत असून आमच्या अडचणीबाबत उदासिन असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. ९० वाहक तर ११० चालकांनी सहभाग नोंदवला होता. अंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष संजय निंबाळकर, सचिव रमेश भोजने यांनी केले. (प्रतिनिधी)
बीडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या वतीने सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी विभागीय सचिव अशोक गावडे, अध्यक्ष अर्जून कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. आगारप्रमुख ए.एस.भुसारी यांनी निवेदनातील काही मागण्या मान्य केल्याचे अर्जून कदम म्हणाले. तसेच सोयी-सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आदराची वागणूक द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. २१ मागण्यांना घेऊन संघटनेने धरणे धरले. यावेळी गावडे, अर्जून कदम यांच्यासह विलास आजले, सत्तार खान, एम.आर.बांड, आर.एम.नागरगोजे, सरतान सय्यद, संजय गायकवाड, एम.एस.येडे, बबन वडमारे, आर.डी.तेलप, पंजाब सुरवसे, एस.जी.केंगार, प्रशांत कोळपकर, अनिल साळुंके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Majalgaon, Ashti Depot closed till noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.