महामॅरेथाॅनमुळे उद्या सकाळच्या वेळेत वाहतुकीमध्ये मोठे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:25 PM2022-12-17T19:25:50+5:302022-12-17T19:26:55+5:30
‘लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल.
औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी रविवारी (दि.१८) पहाटे ५ ते सकाळी ९.३० वाजेदरम्यान काही मार्गांवरील वाहतुकीमध्ये बदल केल्याची माहिती वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
‘लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल. महामॅरेथॉनची सुरुवात विभागीय क्रीडा संकुल येथून सुरू होऊन सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, क्रांतीचौक, गोपाल टी, विटस हॉटेल चौक, रेल्वे स्टेशन रोड येथून यू-टर्न घेऊन विटस हॉटेलपासून देवगिरी महाविद्यालयामार्गे भाजीवालीबाई पुतळा, दर्गा चौकमार्गे विभागीय क्रीडा संकुल येथे येणार आहे. त्यामुळे या मार्गावर स्पर्धकांची संख्या मोठी असेल. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसाेय होऊ नये, यासाठी वाहतुकीमध्ये बदल केला आहे.
रविवारी पहाटे ५ ते सकाळी ९.३० वाजेदरम्यान मॅरेथॉनच्या मार्गावरील डावी बाजू सर्व वाहतुकीस बंद असणार आहे. उजव्या बाजूने येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सुरू राहील. बंदोबस्तावरील अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील व मार्गात बदल करतील. ही अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन व अत्यावश्यक वाहनांना लागू असणार नाही, असेही प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले आहे.
३ कि.मी.
विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ होऊन सूतगिरणी चौक, के. पॉण्ड चौक (जवाहरनगर पोलिस ठाणे चौक), गजानन महाराज मंदिरापासून यू-टर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गाने विभागीय क्रीडा संकुलात समारोप.
५ कि.मी.
विभागीय क्रीडा संकुलातून सुरू होऊन सूतगिरणी चौक, के. पॉण्ड चौक, सेव्हन हिल चौक येथून यू-टर्न घेऊन क्युबा रेस्टॉरंट, गजानन महाराज मंदिरामार्गे विभागीय क्रीडा संकुलात समारोप होईल.
१० कि.मी.
विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ होऊन के. पॉण्ड चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, मोंढा नाका, क्रांतीचौक, जय टॉवर, गोल्डी थिएटर येथून यू-टर्न घेऊन विटस हॉटेल, देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई चौक, दर्गा चौपाटीमार्गे विभागीय क्रीडा संकुलावर समारोप.
२१ कि.मी.
विभागीय क्रीडा संकुल, के. पॉण्ड चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, हॉटेल ग्लोबल, क्रांतीचौक, जय टॉवर, हॉटेल अशोकापासून यू-टर्न घेऊन हॉटेल विटस, देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई चौक, दर्गा चौक, रेमंड शो रूम आणि विभागीय क्रीडा संकुल या मार्गाने दोन राउंड.