शंभर टक्के वसुली करा!
By Admin | Published: March 11, 2016 12:55 AM2016-03-11T00:55:51+5:302016-03-11T01:04:17+5:30
जालना : नगर पालिकेने कर वसुलीत वाढ करून शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करावा, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनी दिल्या. नगर पालिकेत गुरूवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जालना : नगर पालिकेने कर वसुलीत वाढ करून शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करावा, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनी दिल्या. नगर पालिकेत गुरूवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी दीपक पुजारी, सर्व विभागांचे विभाप्रमुख व काही नगरसवेक उपस्थित होते. पालिकेची कर वसुली समाधानकारक नाही. ११ महिन्यांत ८ कोटी ३५ लाखांची वसुली झाली. याची टक्केवारी फक्त ४६ टक्के एवढी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या सूचना डॉ शेळके यांनी दिल्या. यासाठी पालिकेने स्थानिकस्तरावर योग्य नियोजन वसुली करावी. शहरातील ज्या झोपडपट्टया १९९५ च्या निर्णयानुसार अधिकृत झाल्या आहेत. तेथील रहिवाशांना मालमत्तापत्रक देण्याचे आदेश शेळके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. अतिक्रमणाच्या मुद्यांवरून विस्तृत चर्चा झाली. यात प्रामुख्याने मंगळबाजार, जवाहरबाग, गांधीनगर, आझाद मैदान येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या काही मालमत्तांचा विकास करून त्या बीओटी तत्वावर देण्याबाबत चर्चा झाली. जायकवाडी जलवाहिनीतून व्हॉल्व्ह मधून पाणी वाहत आहे. तेथे संरक्षक कवच लावण्याबाबतही चर्चा झाली. फुले मार्केटबाबत नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही डॉ. एन.आर.शेळके यांनी दिल्या. यावेळी दीपक पुजारी यांनी विभागवार माहिती देऊन वसुलीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)