घरीच बनवा दर्जेदार सोयाबीन बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:05 AM2021-04-20T04:05:31+5:302021-04-20T04:05:31+5:30

वेरूळ : शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारचे बियाणे तयार करावे. बियाण्यांची कल्पना आम्हाला द्यावी. आम्ही निवडलेल्या चांगल्या उगवण क्षमता असलेल्या बियाण्याची ...

Make quality soybean seeds at home | घरीच बनवा दर्जेदार सोयाबीन बियाणे

घरीच बनवा दर्जेदार सोयाबीन बियाणे

googlenewsNext

वेरूळ : शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारचे बियाणे तयार करावे. बियाण्यांची कल्पना आम्हाला द्यावी. आम्ही निवडलेल्या चांगल्या उगवण क्षमता असलेल्या बियाण्याची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यास मदत करू असे आश्वासन कृषी अधिकारी विजय नरवडे यांनी केले.

वेरूळ येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे सोयाबीन बियाणे बनविण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. उत्तम प्रकारचे बियाणे तयार केले गेले, तर शेतकऱ्यांच्या बियाणांना योग्य भाव देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येथील शेतकरी गणेश ठेंगडे यांनी घेतलेल्या विक्रमी उत्पादनाची माहिती देखील त्यांनी दिली. गणेश यांनी एकरी दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न घेतले. सध्या सोयाबीनचा भाव सहा हजार पाचशे रुपये असून एकरी त्यांना अवघ्या चार महिन्यात ६५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गणेश ठेंगडे यांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन नरवडे यांनी केले. यावेळी कृषी मंडळ अधिकारी वैशाली पवार, कृषी पर्यवेक्षक जी. जी. मुंडे, कृषी सहायक मनिषा डवारे, शेतकरी मच्छिंद्र ठेंगडे, गणेश ठेंगडे, नरेंद्र मालोदे, अर्जुन बकाल आदींची उपस्थिती होती.

फोटो : तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे, मंडळ अधिकारी वैशाली पवार यांनी शेतकऱ्यांना बियाणे निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.

190421\ramesh rupchand mali_img-20210419-wa0019_1.jpg

सोयाबीन बियाणे बाबात मार्गदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी

Web Title: Make quality soybean seeds at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.