एफएसआयचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:01+5:302021-02-14T04:05:01+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने अलीकडेच राज्यातील सर्व महापालिकांसाठी नवीन युनिफाइड डीसीआर नियमावली तयार करून दिली. त्यानुसार नागरिकांना किंवा बांधकाम ...

Make sure that FSI is not misused | एफएसआयचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या

एफएसआयचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने अलीकडेच राज्यातील सर्व महापालिकांसाठी नवीन युनिफाइड डीसीआर नियमावली तयार करून दिली. त्यानुसार नागरिकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या एफएसआयचा गैरवापर होणार नाही. नवीन घरे घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अतिरिक्त क्षेत्रफळ वाढल्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. तसेच १५०० स्क्वेअर फुटांपर्यंत परवानगीची गरज राहणार नाही आणि ३ हजार स्क्वेअर फुटांपर्यंत बांधकाम परवानगीसाठी नागरिकांनी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर मनपाने १० दिवसांत परवानगी दिलीच पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नवीन तयार होणाऱ्या इमारतींमधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी एक मजल्यासाठी एफएसआय देण्यात येणार आहे.

तसेच त्यांनी यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित काम करून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केले. शहरात होत असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांची प्रशंसा केली.

यावेळी प्रशासक पाण्डेय यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रास्ताविक केले. यात महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रकल्प यांची माहिती दिली. नवीन पाणी पुरवठा योजना, १५० कोटींचे रस्ते, पूर्ण झालेले आणि प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कोविड व्यवस्थापन, कोविड लसीकरण, मेलट्रॉन हॉस्पिटल, आकृतिबंध, पथदिवे, अमृत योजना, माझी वसुंधरा आणि स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी युनिफाइड डीसीआर अंमलबजावणीबाबत सहायक संचालक नगर रचना विभाग जयंत खरवडकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. या सूचनांची दखल घेऊन त्यावर प्राधान्याने लवकरात लवकर काम केले जाईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Make sure that FSI is not misused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.