योग्य गुंतवणूक करत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:02 AM2021-04-23T04:02:26+5:302021-04-23T04:02:26+5:30
अ) मुदत विमा मदत विमा (टर्म प्लॅन) घेतलेल्या विमाधारकाचा कर्जाची परतफेड करण्यापूर्वी मृत्यू झाला, तर अशा प्रकरणात जेवढ्या ...
अ) मुदत विमा
मदत विमा (टर्म प्लॅन) घेतलेल्या विमाधारकाचा कर्जाची परतफेड करण्यापूर्वी मृत्यू झाला, तर अशा प्रकरणात जेवढ्या रकमेचा विमा काढलेला असतो एवढी रक्कम त्याच्या उत्तराधिकाऱ्याला मिळते. उदा. एखादा ३० वर्षीय युवक त्यास कोणतेही व्यसन नाही. त्याने हा १ कोटींचा मुदत विमा काढला असेल तर त्यास वार्षिक हप्ता १३ ते १४ हजार रुपये इतका येऊ शकतो. विम्याची मुदत संपल्यावर जी रक्कम हातात येईल. ती बचत खात्यात ठेवून त्यावरील व्याजावर तो आरामशीर जगू शकतो.
मात्र, ज्याचा मुदत विमा ५ ते १० लाख रुपये आहे. त्याचा हप्ता कमी असतो, पण त्या विमाधारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या उत्तराधिकारीला मिळणारी रक्कम बँकेत बचत खात्यात ठेवली तर किती कमी व्याज मिळेल. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होणे कठीण असते. यामुळे विमा काढताना कमी हप्ता आहे म्हणून विमा काढू नका. त्याची भविष्यात किती रक्कम मिळेल, याकडे लक्ष द्या.
ब) मेडिक्लेम पॉलिसी
कोविड झालेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार झाल्यानंतर जेव्हा खासगी हॉस्पिटलचे बिल त्याच्या हातात येते तेव्हा त्याचे डोळे पांढरे होऊन जातात. एवढा मोठा खर्च करावा लागतो आहे.
जर त्या व्यक्तीची मेडिक्लेम पॉलिसी असती तर हॉस्पिटलचे संपूर्ण बिल त्या विमा कंपनीने भरले असते.
उदा. ३५ वर्षांच्या विमाधारकाने तो, त्याची पत्नी, दोन मुले यांचा मिळून १० लाखांचा विमा काढला तर त्यांना वार्षिक १८ ते २२ हजार रुपये हप्ता येईल. विमाधारक कमी हप्ता बसतो म्हणून कोविड पॉलिसी घेत आहेत. कोविड ही महामारी आहे. आणखी एक ते दीड वर्ष त्याचा प्रकोप राहील. त्यानंतर दुसरा आजार झाला तर त्या वेळी कोविड पॉलिसीचा काही फायदा होणार नाही, कारण देश कोविडमुक्त झाला की, ही पॉलिसी बंद होते.
कोविड पॉलिसीऐवजी तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकता. यातही विमाधारक जास्त हप्ता नको म्हणून २ ते ३ लाखाचा विमा घेतात. मात्र, सध्या आपण पाहात आहोत की, अनेक कुटुंबे असे आहेत की, त्यातील २ ते ३ जण किवा अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यात किती विमाधारक असे आहेत की, त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा रुग्णालयातील खर्च भरून निघेल, असा विमा काढला आहे. असे खूप कमी विमाधारक निघतील. अशा वेळी गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घेऊन मगच मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी. यात जास्त भराव्या लागणाऱ्या हप्त्याला जास्त महत्त्व न देता. त्या पॉलिसीत कुटुंबाला लागलेला रुग्णालयातील संपूर्ण खर्च कव्हर होईल का याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
( जोड )