मूल्य, तत्त्वाशिवाय मनुष्य पशुसमान -धनश्री तळवलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:54 AM2017-12-25T00:54:18+5:302017-12-25T00:55:53+5:30

मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.

 Man, animal, without value, principles - Dadashri Talwalkar | मूल्य, तत्त्वाशिवाय मनुष्य पशुसमान -धनश्री तळवलकर

मूल्य, तत्त्वाशिवाय मनुष्य पशुसमान -धनश्री तळवलकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.
श्रीमद् भगवतगीता जयंतीनिमित्त स्वाध्याय परिवाराच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दीदी रविवारी सर्व स्वाध्यायी परिवाराच्या भेटीला औरंगाबादेत आल्या होत्या. दीदींचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खचाखच भरले होते. शिवाय बाहेरील रस्त्यावर हजारो लोक बसले होते. त्यांच्यासाठी दोन ठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. एवढा जनसमुदाय असतानाही वातावरण एकदम शांत होते. प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता. या सोहळ्यातून स्वाध्याय परिवाराने सर्वांना शांती, शिस्तीचे दर्शन घडविले.
दीदींचे सायंकाळी व्यासपीठावर आगमन होताच दीदींनी सर्वांना नमस्कार केला तेव्हा जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर स्वाध्याय केंद्रात जाणाºया या मराठवाडा व विदर्भातील हजारो युवक-युवतींनी ‘यह धरती अंबर सब सुंदर है’ या भावगीतावर नृत्यवंदना केली. गीत संपल्यावर ‘कृष्णम वंदे जगतगुरू’, ‘ हमारी शक्ती कृष्ण की भक्ती’ असा जयघोष करण्यात आला. याचाच धागा पकडून दीदींनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. नुसत्या घरात किंवा गल्लीत जयघोष करून ‘कृष्ण जगत गुरू होणार का’ असा प्रश्न दीदींनी उपस्थित युवक-युवतींना विचारला. आपण जयघोष केला नाही तरी कृष्ण हे जगतगुरू आहेत व राहणारच. आयुष्याची सुरुवात भगवतगीता वाचून केली पाहिजे. पण ज्यांनी डोळे बंद केले त्यांना गीतेतील ज्ञान कसे मिळेल. यासाठी सर्वप्रथम मनुष्यातील माणसाला जागे केले पाहिजे. नुसती इमारत, पूल बांधून विकास होत नसतो. घरटे तर पक्षीही बांधतात.
तेही इमारतीपेक्षा मजबूत असते. मग पशु-पक्ष्यांपेक्षा आपण वेगळे काय करतो. माणसाच्या जीवनात
‘मूल्य’, ‘तत्त्व’ नसेल तर तो पशुसमानच आहे. ज्या दिवशी मनुष्याला हे कळेल त्या दिवशी सर्व भेदभाव विसरून ‘तेजोमय’ जीवन जगेल, असा आत्मविश्वास
दीदींनी प्रत्येक मनामनात निर्माण केला.
तत्पूर्वी मराठवाडा व विदर्भातील १६ युवक-युवतींनी ‘गीता-तेज का दर्शन, जीवनमूल्य संवर्धन’
या विषयावर आपले विचार
मांडले. आपले विचार
प्रभावीपणे मांडण्यासाठी स्पर्धकांनी ‘मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी’ भाषेचा वापर केला. त्यासही उपस्थितांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
भगवतगीता, शाल, नारळ झाले ‘मॅचिंग’
धनश्री तळवलकर (दीदी) यांनी सांगितले की, श्रीमद् भगवतगीतेचे महत्त्व फक्त सेवानिवृत्तीच्या दिवशी सप्रेम भेट म्हणून देण्यापुरतेच उरले आहे. भगवतगीता, शाल व नारळ जणू काही ‘मॅचिंग’ झाले आहे. गीता हे तत्त्वज्ञान आहे, असे मानून घराच्या एखाद्या कोनाड्यात ती ठेवली जाते.
मात्र, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही गीता अत्यंत साधी-सोपी आहे. ती एवढी सोपी आहे की, एखाद्या आईने मुलाची घातलेली समजूत आहे, असे सांगत दीदींनी प्रत्येकाला भगवतगीता समजून त्याचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.

Web Title:  Man, animal, without value, principles - Dadashri Talwalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.