मनीषाच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी क्रीडाप्रेमींनी दिला आर्थिक मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:42 AM2018-04-01T00:42:00+5:302018-04-01T00:43:11+5:30
औरंगाबादची आंतरराष्ट्रीय जिगरबाज गिर्यारोहक मनीषा वाघमारे गतवर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करता करता थोडक्यात वंचित राहिली. त्या वेळेस खराब हवामानामुळे तिला यश मिळवता आले नाही; परंतु आता ती पुन्हा या खडतर मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेसाठी आर्थिक चिंता तिला सतावत होती; परंतु औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने तिच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि त्यास क्रीडा संघटक, क्रीडाप्रेमी, जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनीषा ४ एप्रिलला माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी औरंगाबाद येथून रवाना होत आहे.
औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय जिगरबाज गिर्यारोहक मनीषा वाघमारे गतवर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करता करता थोडक्यात वंचित राहिली. त्या वेळेस खराब हवामानामुळे तिला यश मिळवता आले नाही; परंतु आता ती पुन्हा या खडतर मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेसाठी आर्थिक चिंता तिला सतावत होती; परंतु औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने तिच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि त्यास क्रीडा संघटक, क्रीडाप्रेमी, जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनीषा ४ एप्रिलला माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी औरंगाबाद येथून रवाना होत आहे.
इं.भा. पाटील महिला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असलेली मनीषा वाघमारेने आतापर्यंत अनेक सर्वोच्च शिखरे सर केलेली आहेत. गतवर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करताना अवघे १७० मीटर अंतरावर असतानाच खराब हवामानामुळे तिला माघारी फिरावे लागले. गतवर्षी या मोहिमेसाठी घेतलेल्या कर्जानंतरही तिने यावर्षी जिद्दीने दुसऱ्यांदा मोहीम आखली. मनीषाच्या या मोहिमेसाठी जिल्हा आॅलिम्पिक संघटनेने मदतनिधी गोळा केला आणि शनिवारी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांच्या हस्ते तिला शहरातील विविध खेळांचे संघटक, पदाधिकारी आणि अनेक दिग्गजांच्या वतीने ६२ हजार रुपयांचा धनादेश दिला. या प्रसंगी जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष विनोद नरवडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक दयानंद कांबळे, उपाध्यक्ष फुलचंद सलामपुरे, सहसचिव दिनेश वंजारे, प्रदीप खांड्रे, राकेश खैरनार, जगदीश खैरनार आदी उपस्थित होते.
या क्रीडाप्रेमी, संघटक व अधिकाºयांनी दिला मदतीचा हात
आॅलिम्पिक असोसिएशनच्या आवाहनानंतर गोविंद शर्मा, आदित्य वाघमारे, मिलिंद काटमोरे, प्रदीप खांड्रे, संदीप गायकवाड, अभय देशमुख, विश्वास जोशी, जयंत कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, मकरंद जोशी, प्रभुलाल पटेल, विनोद नरवडे, अभय देशमुख, लक्ष्मीकांत खिची, सचिन मुळे, कुलजितसिंग दरोगा, अरुण भोसले, के. राघवेंद्र, पंकज भारसाखळे, रंजन बडवणे, सुरेश मिरकर, चरणजितसिंग संघा, नीरज बोरसे, सुधीर भालेराव, उदय डोंगरे, दिनेश वंजारे, राकेश खैरनार, ऊर्मिला मोराळे, कृष्णा केंद्रे, गोकुळ तांदळे, विलास चंदने, दीपक रुईकर, रणजित भारद्वाज, दीपक भारद्वाज, मंगेश डोंगरे, संदीप ढंगारे, राजकुमार माहादावाड, चंद्रशेखर घुगे, चंद्रकांत मखरे, गणेश कड, सचिन पुरी, सुभाष मुरकुंडे, हेमंत मोरे, संग्राम देशमुख, तुषार वखरे, मनजितसिंग दरोगा, विष्णू लोखंडे, वीरेंद्र भांडारकर, संतोष कुन्नपाडा, अब्दुल कदीर, सतीश पाठक, कल्पना झरीकर, शेखर शिरसाठ, शत्रुंजय कोटे, एस. एस शेख, माणिक राठोड, प्रदीप दुबे, नीलेश हारदे, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले यांनी मदतीचा हात दिला.