वाळूज भागातून मनपाला पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:18 AM2018-02-22T00:18:57+5:302018-02-22T00:19:02+5:30

शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.

Manalaya blasted from the part of the sand area | वाळूज भागातून मनपाला पिटाळले

वाळूज भागातून मनपाला पिटाळले

googlenewsNext
ठळक मुद्देकच-याचा प्रश्न: जंगजंग पछाडूनही अपयश पदरी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.
मनपा प्रशासनाने मंगळवारी रात्रीच खंडेवाडी शिवारात खाजगी व्यक्तीच्या जागेवर कचरा टाकण्याचा प्लॅन आखला होता. प्लॅननुसार सकाळी ६ वाजता कचरा टाकण्यात आला. पहिला प्रयोग यशस्वी होताच मनपाने दुसºया टप्प्यातील ट्रकही या भागात बोलावून घेतले. ट्रक वाळूज-हनुमंतगावमार्गे पैठण तालुक्यातील खंडेवाडी-नायगव्हाण शिवाराकडे जाताना नागरिक व शेतकºयांनी पाहिले. काही नागरिकांनी या ट्रकचा पाठलाग केला. खंडेवाडी शिवारातील एका मोठ्या खड्ड्यात कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसले. नागरिकांनी ट्रक अडविले. घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी अधिकाºयांना घेराव घालत कचरा डेपो सुरू करण्यास विरोध दर्शविला. कचरा डेपो सुरू करण्यापूर्वी आम्हाला विष द्या, कचºयाच्या गाड्यांखाली आम्ही झोपू, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकाºयांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी वाळूजचे काकासाहेब चापे, दयानंद साबळे, ग्रामपंचायत सदस्य पपीन माने, थॉमस साबळे आदींसह हनुमंतगाव, नायगव्हाण, खंडेवाडी, नायगाव आदी भागांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सहा. पोलीस आयुक्त डी.एन. मुंढे, पो.नि. सतीश टाक आदींचा फौजफाटा घटनास्थळी होता.
शासनाच्या सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत पैठणखेडा ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. याठिकाणी कचरा डेपो सुरू करू नये, अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. या निवेदनावर सरपंच लता ढगे, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर राघुडे, सोमीनाथ देसाई, दत्तात्रय देसाई, बाबासाहेब गरड, कल्याण राघुडे, बाळू गरड, उत्तम गायकवाड, पंडित पवार, शिवसिंग राणा, सोनाली देसाई, प्रभू गायकवाड आदींची स्वाक्षरी आहे.
नारेगावमुळे सर्वत्र बदनामी
मनपाने सर्वप्रथम पैठण रोडवर बाभूळगाव, पडेगाव-मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; पण मनपाला यश आले नाही. मनपाच्या नारेगाव प्रकल्पाची एवढी बदनामी झाली आहे की, मनपाला कुठेच कचरा टाकण्याची परवानगी मिळणे शक्य नाही.

Web Title: Manalaya blasted from the part of the sand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.