मनपा देणार पर्यटनाला ‘वाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 12:56 AM2016-05-24T00:56:39+5:302016-05-24T01:23:41+5:30

औरंगाबाद : मनपा प्रशासनाने पर्यटनाला वाव देण्यासाठी यंदा अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. शहरात पर्यटन वाढीसाठी कोणत्या

Manashakti's tourism 'Vava' | मनपा देणार पर्यटनाला ‘वाव’

मनपा देणार पर्यटनाला ‘वाव’

googlenewsNext


औरंगाबाद : मनपा प्रशासनाने पर्यटनाला वाव देण्यासाठी यंदा अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. शहरात पर्यटन वाढीसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील यासाठी सोमवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बैठक घेतली. बैठकीत विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार भविष्यात मनपा पर्यटन वृद्धीसाठी काम करणार असल्याचे बकोरिया यांनी बैठकीत सांगितले.
ऐतिहासिक औरंगाबादेत दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक सायंकाळी निघून जातात. पर्यटकांनी किमान दोन दिवस तरी शहरात मुक्काम ठोकावा या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. औरंगाबाद शहराची देशभरात आणि जागतिक पातळीवर मार्केटिंग करण्यात यावी. महाराष्ट्रासह देशभरातील शाळांना सहल औरंगाबादेत आणावी म्हणून मनपातर्फे निमंत्रण देण्यात यावे. पर्यटन अ‍ॅप तयार करावे, दिल्ली ते औरंगाबाद रेल्वे आणि विमानसेवा अधिक मजबूत करावी.
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. धार्मिक स्थळांकडे येणाऱ्या भाविकांना शहरात पर्यटन केंद्र पाहण्यासाठी वळविण्यात यावे आदी अनेक सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. मनपा आयुक्त बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे यांनी हळूहळू मनपातर्फे विविध कामे करण्याचे आश्वासन देण्यात आले. टाऊन हॉल येथे गझल, भारुड, मुशायरा आदी सांस्कृतिक कार्यक्रम (पान २ वर)

Web Title: Manashakti's tourism 'Vava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.