मंगलम क्लाऊड किचनचा आता मुंबईत विस्तार
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:34+5:302020-11-22T09:01:34+5:30
औरंगाबाद : शहरातील नामवंत गादिया ग्रुपचे मंगलम क्लाऊड किचनचे युनिट आता मुंबईतही सुरू झाले आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन सुरू ...
औरंगाबाद : शहरातील नामवंत गादिया ग्रुपचे मंगलम क्लाऊड किचनचे युनिट आता मुंबईतही सुरू झाले आहे.
कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन सुरू झाले त्यावेळी धर्मादाय व समाजसेवेचे कार्य म्हणून मंगलम क्लाऊड किचन सुरू करण्यात आले. दर्जेदार खाद्यपदार्थ तेही सर्वांना परवडेल अशा माफक किमतीत देण्याचा उद्देश ठेवून किचन सुरू केले. लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात ६ लाख जेवणाच्या पाकिटांची निर्मिती करण्यात आली. राज्याच्या राजधानीतील लोकांची गरज लक्षात घेऊन मंगलम क्लाऊड किचन आता मुंबईत सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष शिरीष गादिया यांनी सांगितले की, मुंबईतही मंगलम क्लाऊड किचनचे युनिट सुरू करण्यात आले आहे.
महानगरात ६०० विक्री केंद्रे ( फ्रँचाईसी आऊटलूक ) करण्याचा मानस आहे. त्यातील ७५ ठिकाणांसाठी फ्रँचाईसी करारनामे झाले आहेत. त्याही १० विक्री केंद्रांची उभारणी झाली आहे. यात मुलुड, भांडुप, उरण, सानपाडा, ठाणे (रुनवाल), ठाणे (स्टेशन) येथे जेवणाच्या पाकिटांची विक्री सुरू झाली आहे. जेवण तयार करताना ब्लास्ट चिलिंग पद्धतीने अवलंब करून तयार केले जात असल्याने जेवणाचा दर्जा, ताजेपणा बराच काळ टिकून राहतो. किंमत ५० रुपये, ६५ रुपये, ७५ रुपये व ११० रुपये या किमतीत जेवणाचे पाकीट विकले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.