अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात ‘माणिक हॉस्पिटल’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:07 PM2018-04-03T15:07:29+5:302018-04-03T15:21:50+5:30

जवाहरनगर पोलीस ठाण्यालगत असलेले माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात आल्यामुळे आग विझविण्याच्या मदतकार्यात अनेक अडथळे आले.

'Manik Hospital' in the circle of unauthorized construction | अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात ‘माणिक हॉस्पिटल’ 

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात ‘माणिक हॉस्पिटल’ 

googlenewsNext

औरंगाबाद : जवाहरनगर पोलीस ठाण्यालगत असलेले माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात आल्यामुळे आग विझविण्याच्या मदतकार्यात अनेक अडथळे आले. पार्किंगच्या जागेत पुरुष जनरल वॉर्ड, कॅन्टीन, भौतिक उपचार, रेडिओलॉजी, आयसीयू, रुग्ण नातेवाईक प्रतीक्षालय, जनरेटर, प्रसाधनगृह बांधल्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

पुरुष जनरल वॉर्ड पार्किंगमध्ये बांधलेला आहे. हॉस्पिटलच्या एकूण बांधकाम परवानगीत त्या जागेचा वापर पार्किंगसाठी नमूद केलेला आहे. तेथे हा वॉर्ड व इतर विभाग बांधले जात असताना महापालिकेच्या यंत्रणेने अक्षम्य दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आहे. तिसºया मजल्यावर एक मजला बांधला असून, त्यावर एका पत्र्याच्या  शेडचे बांधकाम सुरू आहे. त्यालाही बांधकाम परवानगी घेतली आहे की नाही, याबाबत हॉस्पिटलकडून काहीही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. माहिती मिळताच घटनास्थळाकडे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आ.अतुल सावे, किशनचंद तनवाणी, संजय जोशी, राजेंद्र जंजाळ आदींनी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी आर. के. सुरे, सी. एल. भंडारे, विनायक कदम, हरिभाऊ घुगे, एस. एम. शकील, एल. एम. हुसैन, दिनेश मुुंगसे, छगन सलामबाद, तुषार तौर, प्रसाद शिंदे, रमेश सोनवणे, सुभाष घरत, एस. एम. कुलकर्णी, शेख असलम, मदन पाटील, मयूर कुमावत, रामेश्वर बमणे, रवी हरणे या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

फायर एक्सटिंगशर निकामी
माणिक हॉस्पिटलचे अंतर्गत बांधकाम सुरू असून, इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलमध्ये आग विझविण्यासाठी असलेली यंत्रणा पूर्णत: निकामी असल्याचे दिसून आले. अंतर्गत नूतनीकरणाच्या कामामुळे सगळी यंत्रणा कोलमडलेली असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या यंत्रणेवर अधिक भार पडला. 

दैव बलवत्तर म्हणून रुग्ण वाचले
दैव बलवत्तर असल्यामुळे रुग्ण वाचल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलमधील कर्मचाºयांनी व्यक्त केली. बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा असल्यामुळे वरच्या मजल्यावर रुग्णांना खिडकी फोडून बाहेर काढावे लागले. इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या मार्गात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षालय बांधण्यात आले आहे, जे अनधिकृत आहे. कॅन्टीनदेखील अनधिकृत आहे. तेथे रुग्ण नातेवाईक अडकले होते, त्यांना मुख्य  प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. 

पूर्ण चौकशी करणार
प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, या प्रकरणात पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. हॉस्पिटलने पार्किंगच्या जागेत अनेक वॉर्ड थाटल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. यावर ते म्हणाले, बांधकाम परवानगी व इतर बाबी चौकशीनंतर समोर येतील. 

Web Title: 'Manik Hospital' in the circle of unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.