मन्मथमाऊली, गुरुराज माऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:57 AM2017-11-04T00:57:36+5:302017-11-04T00:57:42+5:30

‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रेत कानी पडत होता.

Manmthmauli, Gururaj Mauli | मन्मथमाऊली, गुरुराज माऊली

मन्मथमाऊली, गुरुराज माऊली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रेत कानी पडत होता. श्रीक्षेत्र कपिलधार येथे शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराजांनी वयाच्या २६ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. मन्मथस्वामींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या याठिकाणी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. राज्यासह इतर राज्यातून याठिकाणी ५० दिंड्या आल्याचे श्रीक्षेत्र कपिलधार मन्मथस्वामी देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले. घाटमाथ्यावर विद्युत व्यवस्था केल्यामुळे सुविधा झाली असून, सीसीटीव्हीची व्यवस्था येथे आहे.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज, सोमेलिंगेश्वर बिचकुंदा महाराज, आ. जयदत्त क्षीरसागर, बिचकुंदाचे आ. हनमंत पाटील यांच्यासह शिवाचार्य व मन्मथस्वामी देवस्थान पंचकमिटी सदस्यांच्या उपस्थितीत रीतिरिवाजाप्रमाणे महापूजा झाली. आ. विनायक मेटे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भेट देऊन दर्शन घेतले. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह पदाधिका-यांनी दर्शन घेतले.
शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, सिध्दलिंग महाराज साखरखेर्डेकर, सिध्देश्वरलिंग महाराज, मठ संस्थान गडगा, नीळकंठ महाराज धारेश्वर, राचलिंग महाराज परंडकर, महादेव महाराज कळमनुरी, शंकरलिंग महाराज शिरूर अनंतपाळ, सांबसदाशिव महाराज थोरला मठ वसमत, दिगंबर महाराज वसमत, सुवानंद महाराज तमलूर, करबस्व लासीना मठ वसमत, नंदिकेश्वर महाराज पुर्णेकर, प्रभुदेव महाराज माडेकर, गंगाधर महाराज औंधकर बार्शी, मनिकंठ स्वामी रेवडकर मठ बार्शी, गुरूपाद शिवाचार्य गिरगावकर महाराज यांच्यासह ५० शिवाचार्य श्रीक्षेत्र कपिलधार येथे उपस्थित होते.
यात्रोत्सवासाठी विश्वस्त कमिटीचे दोनशे स्वयंसेवक कार्यरत होते. परिसरात वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्नीशामक यंत्रणा सज्ज होती. मन्मथस्वामी देवस्थान पंचकमिटीचे वैजनाथअप्पा मिटकरी, बाबासाहेब कोरे, सोमनाथअप्पा हालगे, अ‍ॅड. शांतीवीर चौधरी, नागेश मिटकरी, विश्वनाथअप्पा संगशेट्टी, आश्रुबा रसाळ, सिद्धलिंगअप्पा टेकाळे, अ‍ॅड. उमाकांतअप्पा पाटील, अ‍ॅड. विजयकुमार कोरे, मन्मथअप्पा गिरवलकर, मल्लिकार्जुनअप्पा इंदे, दिगांबरअप्पा नगरकर, विष्णुपंत वाघमारे, शिवशंकर भुरे, विजयकुमार मेनकुदळे, सुनील रुकारी, जगन्नाथअप्पा वाडकर आदींसह वीरशैव बांधव परिश्रम घेत होते.

Web Title: Manmthmauli, Gururaj Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.