स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मनोहरे रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:28+5:302021-02-23T04:06:28+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सोमवारी दुपारी बाबासाहेब मनोहरे रुजू झाले. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनोहरे यांच्या ...
औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सोमवारी दुपारी बाबासाहेब मनोहरे रुजू झाले.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीला तोंडी स्थगिती दिली होती. मात्र शासनाने मनोहरे यांना दिलेली ऑर्डर मागे घेतली नाही. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत मनोहरे यांची भेट निश्चित झाली होती. मात्र ती होऊ शकली नाही. त्यामुळे सायंकाळी मनोहरे यांनी पदभार स्वीकारला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी मनोहरे रुजू होण्यासाठी औरंगाबादेत आले. मात्र त्यांच्या नियुक्तीला पालकमंत्र्यांनी तोंडी स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मनोहरे यांनी परस्पर आपण रुजू होत असल्याचे पत्र महापालिका प्रशासक, शासन आणि जिल्हाधिकारी यांना पाठविले. मागील तीन दिवसांपासून सुट्या होत्या. सोमवारी मनोहरे पदभार घेण्यासाठी आले. दुपारी चार वाजता प्रशासक त्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनी तब्येत चांगली नसल्याचा निरोप मनोहरे यांना दिला. या वेगवान घडामोडींनंतर मनोहरे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आमखास मैदानाच्या बाजूला स्मार्ट सिटीच्या नियोजित इमारतीची पाहणी केली. दरम्यान, या सर्व प्रक्रियेबाबत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी मनोहरे यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला आहे.
मागील काही दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा जोरदार वाद सुरू होता, त्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.