"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:48 AM2024-07-26T11:48:33+5:302024-07-26T11:54:13+5:30

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil said that Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray should clarify their position regarding giving reservation to Maratha reservation from OBC | "पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :  गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू आहे.  दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. काही दिवसातच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी जाणार आहे, त्याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आव्हान केले. 

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध सुरू केला असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  
पत्रकारांसोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचे विरोधक नाही.आम्ही जो चुकला त्याला बोलतो. फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं. मराठा समाज ५० , ५५ टक्के आहे. आम्ही कोणालाच आव्हान करत नाही. आम्ही आणि आमच्या समाजाला आव्हान करतो, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठ्यांसमोर तुम्ही शांत बसला नाही, मराठ्यांना असंच डिवचत राहिला तर, मला उघड पाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय जीवनातून मराठा तुम्हाला संपवणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज अनेक दिवसापासून कष्ट करत आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आमची मुल हमालासारख काम करत आहेत. आमची सुद्धा आता मुल मोठं झाली पाहिजेत. त्यामुळे आता शहरापासून ग्रामीण भागातील मराठा समाज चिडला आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठा समाजात आता यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. हे लोक सत्तेत असून टारगेट करत आहेत. मराठा समाज आता जशास तसे उत्तर देत आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मी आता सात ते आठ दिवस काही बोलणार नाही. आता आमचं लक्ष २०२४ आहे, सगळी पाडापाडी करणार, असंही पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हान

जरांगे पाटील म्हणाले, काही दिवसापूर्वी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. यावर आता मी सांगतो, ही जी त्यांनी तीन नावे घेतली यांनी क्लिअक भूमिका घेतली पाहिजे. यांनी मराठ्यांना ओबीसीतून मिळावे अशी भूमिका घेतली पाहिजे, असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

"तुम्ही त्यांना एकदा भूमिका विचारली तर त्यांनी काही सांगितली नाही, आता तुम्ही सरळ आरक्षण दिले पाहिजे. ते नाही म्हटले म्हणून तुम्ही आमचं वाटोळ करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.  भूमिका घ्यायची की नाही हे त्यांनी ठरवले पाहिजे, 

Web Title: Manoj Jarange Patil said that Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray should clarify their position regarding giving reservation to Maratha reservation from OBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.