मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:52 PM2024-10-03T13:52:24+5:302024-10-03T13:52:56+5:30
Manoj Jarange Patil : रुग्णालयातून सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे समजते.
Manoj Jarange Patil ( Marathi News ) : राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह आता राज्यात तिसरी आघाडी सुरू झाली आहे. दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असतील , असं विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "प्रत्येकाची भावना असते. राजरत्न आंबेडकर साहेबांची भावना आहे, सगळेच म्हणत आहेत. पण, माझं क्लिअर आहे. माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आले आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"भाजपामधील मराठ्यांचे आमदार , मंत्री, खासदार यांना मी आवाहन केले आहे की ज्या मागण्या आहेत द्या. जर देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागाच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांच्यात बाजूने उभं रहायचं. तुमची जर लेकर मोठी करायची असतील तर फडणवीसांना सांगा आमच्या मागण्या मान्य करायला, असंही जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही तुमच्या नेत्याला फडवणीस यांना समजून सांगा.निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाही तर फडवणीस यांच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी चूक असेल, देवेंद्र फडवणीस निवडणूक लागण्या अगोदर मागण्या मान्य करा, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
"हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे, सगळी एकत्र या. कोणीही आडवं पडू नका. राज्यातील मराठ्यांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे, कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.