जिल्ह्यात तब्बल १,३३३ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:02 AM2021-09-04T04:02:26+5:302021-09-04T04:02:26+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील जिल्ह्यात २ लाख ११ हजार बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल १ हजार ३३३ ...

As many as 1,333 children are severely malnourished in the district | जिल्ह्यात तब्बल १,३३३ बालके तीव्र कुपोषित

जिल्ह्यात तब्बल १,३३३ बालके तीव्र कुपोषित

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील जिल्ह्यात २ लाख ११ हजार बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल १ हजार ३३३ अति तीव्र तर ७ हजार २२४ मध्यम कुपोषित बालके आढळून आली. अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले दिली.

कोरोना काळात ० ते ६ वयोगटांतील बालकांच्या वजन व उंची मोजण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरच्या दरम्यान ४११ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन बालकांची वजन, उंची मोजून बालकांचा शोध घेतल्या गेला. त्यात १ हजार ३३३ बालके अति तीव्र तर ७ हजार २२४ बालके मध्यम कुपोषित असल्याचे समोर आले. सप्टेंबर महिना ‘पोषण आहार महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांच्या पोषण आहार व महिलांत विविध उपक्रमांतून पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येत असल्याचे मिरकले यांनी सांगितले.

Web Title: As many as 1,333 children are severely malnourished in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.