अनेकांची झाली घराची स्वप्नपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:02 AM2021-02-23T04:02:27+5:302021-02-23T04:02:27+5:30
औरंगाबाद : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध भागांतील गृह प्रकल्प पाहण्यासाठी दोन महिने कमी पडले असते; पण लोकमत ...
औरंगाबाद : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे विविध भागांतील गृह प्रकल्प पाहण्यासाठी दोन महिने कमी पडले असते; पण लोकमत प्रॉपर्टी शोमध्ये एकाच छताखाली नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या शंभर पेक्षा अधिक प्रकल्पांची इत्यंभूत माहिती मिळाली. वेळ व पैशांची बचत झालीच, शिवाय मनपसंत परिसरात फ्लॅटही मिळाला व लगेच बुकिंग केली, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केल्या. प्रत्येक प्रकल्पात बुकिंग झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये समाधान पसरले आणि याच आनंदी वातावरणात आयकॉन प्रस्तुत लोकमत प्रॉपर्टी शो २०२१ ची रविवारी यशस्वी सांगता झाली.
मागील दोन दिवसांत गृह प्रदर्शनाला शेकडो ग्राहकांनी भेट दिली. रविवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच नागरिकांनी प्रदर्शनात येण्यास सुरुवात केली होती. कोणी पत्नीसोबत, तर कोणी मुला, मुलीसोबत प्रदर्शनात आले होते. काही जण आपले मित्र, नातेवाइकांच्या समवेत गृह प्रकल्पाची माहिती घेत होते. आवडीच्या परिसरात तेही बजेटमध्ये गृहप्रकल्प असल्याची माहिती मिळताच लगेच त्या गृहप्रकल्पाला भेट देण्यासाठी ग्राहक जात होते. आजही औरंगाबाद व पुणे येथील गृह प्रकल्पात अनेकांनी बुकिंग केली, तर काही जणांनी येत्या काळात बुकिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. योग्य वेळी गृह प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल नामांकित बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
चौकट
रो बंगल्याची माहिती घेतली
आम्हाला पैठणरोडवर रो बंगला पाहिजे. त्यासाठी आम्ही लोकमत प्रॉपर्टी शोला भेट दिली. ८० लाखांपर्यंतचे बजेट आहे. आम्हाला काही बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पाची माहिती मिळाली.
डॉ. प्रज्ञा बनसोडे
---
७० टक्के गृहप्रकल्पाची माहिती मिळाली
आम्ही शहरातील काही परिसरातच घर खरेदी करण्याचा निर्णय पक्का केला आहे. ‘लोकमत’च्या गृहप्रदर्शनात आम्ही निवडलेल्या परिसरात ७० टक्के गृहप्रकल्प उभारले जात असल्याची माहिती मिळाली. प्रकल्पांना भेट देऊन मगच फ्लॅट्स बुकिंग करणार आहोत.
संदीप मोहन
बँकर्स
----
प्लॉट खरेदीसाठी आलो
आमचे स्वतःचे रो हाऊस व एक फ्लॅट आहे; पण आता एखादा प्लॉट खरेदी करून त्यावर मनासारखे बांधकाम करावे व त्या बंगल्यात राहायला जावे, असा आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला ‘लोकमत’च्या गृह प्रदर्शनात काही बांधकाम व्यावसायिकांच्या प्लॉटच्या प्रकल्पांची माहिती मिळाली.
निकिता राजहंस
आकाशवाणी, कर्मचारी