जिल्ह्यातील अनेक कामांचे इन्स्पेक्शन रजिस्टर गायब

By Admin | Published: September 7, 2016 12:16 AM2016-09-07T00:16:04+5:302016-09-07T00:38:58+5:30

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामांचे तपासणी (इन्स्पेक्शन) रजिस्टर गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Many inspection registers of the work disappeared in the district | जिल्ह्यातील अनेक कामांचे इन्स्पेक्शन रजिस्टर गायब

जिल्ह्यातील अनेक कामांचे इन्स्पेक्शन रजिस्टर गायब

googlenewsNext


औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामांचे तपासणी (इन्स्पेक्शन) रजिस्टर गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. दीड वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची कामे केलेल्या मेजरबुकचा तपास लागत नसून त्यामध्ये आता इन्स्पेक्शन रजिस्टरची भर पडल्याने विभागाचा सगळा कारभार आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील खचलेल्या पुलाचा इन्स्पेक्शन रजिस्टरचा कसून शोध सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक बांधकामांचे इन्स्पेक्शन रामभरोसे असल्याचे यातून दिसते आहे.
विभागात दीड वर्षांपासून १६ हजार ६४८ मेजरबुक (काम मोजमाप पुस्तिका) गहाळ आहेत. एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामाच्या नोंदी जरी गृहीत धरल्या तरी कोट्यवधी रुपयांच्या कामांत घोटाळा झाल्याची शक्यता आहे. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल अदा केले गेले आहे, याचा लेखाजोखा लेखा विभागाला आजपर्यंत सांगता येत नाही.
कन्नड रोडवरील सिल्लोड तालुक्यातील मोढा खु.वाडी शिवारातील गट नं. २४२, २४३ हद्दीतील पखाना नाल्यावरील दगडी पूल सोमवारी खचला. कन्नड ते भराडी या राज्य मार्गावर तो पूल आहे. यात चार जण जखमी झाले. या पुलाची तांत्रिक माहिती देण्यासाठी बांधकाम विभागाचा कुठलाही अधिकारी, अभियंता सोमवारी पुढे आला नाही. अशीच परिस्थिती मंगळवारी देखील होती.
त्या पुलाच्या रेकॉर्डची जुळवाजुळव करण्यात सगळा विभाग कामाला लागला होता. त्या पुलाची कुठलीही तांत्रिक माहिती विभागाने घटना घडल्यानंतर एक दिवस उलटला तरी समोर आणली नाही. दरम्यान, सिल्लोडच्या घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, पुलाची तांत्रिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही कामाचे टेंडर काढल्यानंतर जेव्हा काम सुरू होते, तेव्हा त्या कामाच्या निर्धारित कालावधीतील नोंद मेजरबुकमध्ये ठेवली जाते.
कामाचे मोजमाप आणि टेंडरमधील तरतुदी याची माहिती त्यामध्ये असते. मेजरबुकच्या नोंदीनंतरच सी. सी. तयार होऊन ती लेखा विभागाकडे जाते व त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला बिल अदा केले जाते. तर रजिस्टरमध्ये कामाच्या इन्स्पेक्शनची माहिती नोंदविली जाते.

Web Title: Many inspection registers of the work disappeared in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.