जुन्या एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीच्या प्रेमात अनेक जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:05 AM2021-09-22T04:05:22+5:302021-09-22T04:05:22+5:30

औरंगाबाद : महापालिका निवडणूक कधी होईल हे निश्चित नाही. मात्र, निवडणूक जेव्हा केव्हा होईल तेव्हा ती एक सदस्यीय पद्धतीने ...

Many in love with the old one-member ward system | जुन्या एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीच्या प्रेमात अनेक जण

जुन्या एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीच्या प्रेमात अनेक जण

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका निवडणूक कधी होईल हे निश्चित नाही. मात्र, निवडणूक जेव्हा केव्हा होईल तेव्हा ती एक सदस्यीय पद्धतीने होणार की बहुसदस्यीय (पॅनल) पद्धतीने, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आतापर्यंत एक सदस्यीय पद्धतीने घेण्यात आली. आता दोन सदस्यांचा प्रभाग करून निवडणूक घेण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा रक्तदाब वाढला आहे. २० हजार मतदारांच्या प्रभागात आपण विजयी होऊ याची अनेकांना शाश्वती वाटत नाही.

औरंगाबाद महापालिकेच्या आतापर्यंत ६ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. १९८८ मध्ये प्रथम निवडणूक झाली. १९९५ मध्ये दुसरी निवडणूक पार पडली. २०००, २००५, २०१० आणि शेवटची निवडणूक २०१५ मध्ये झाली. या निवडणुकांत एक सदस्य पद्धत होती. शिवसेना-भाजप युती सत्तेत असताना महापालिका निवडणुका तीन सदस्यांचा प्रभाग करून घेण्याचा निर्णय झाला होता. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून सर्व महापालिकांमध्ये एक सदस्य पद्धतच राबविण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा दोन सदस्यांचा प्रभाग करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला. यावर शासनाने अंतिम निर्णय घेतलेला नाही. शासनाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले तर सर्वच राजकीय पक्षांचा कस लागेल. अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येईल.

काय म्हणतात राजकीय नेते..

एकच सदस्य पद्धत कधीही चांगली. दोन जणांचा प्रभाग केल्यास निवडणूक लढविणे फारच त्रासदायक असते. दुसऱ्या वॉर्डातील मतदान केलेल्यांकडेही लक्ष द्यावे लागते. आपल्या सोबतचा उमेदवार कसा असतो यावर बरेच काही अवलंबून असते.

रशीद मामू, माजी महापौर

दोन वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणूक घेणे चुकीचे आहे. अनेक उमेदवार एकच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्य करतात. त्यांना अचानक दोन वॉर्डांमध्ये निवडणूक लढवणे जड जाते. जुनी सिंगल वॉर्ड पद्धतच योग्य आहे.

नंदकुमार घोडेले, माजी महापौर

एकच वॉर्ड असला तर सर्वांना संधी मिळते. प्रभाग करायचा असेल तर किमान ३ जणांचा करायला हवा. सध्या एक वॉर्ड पद्धत असून, तीच पद्धत पुढे ठेवायला हरकत नाही.

अतुल सावे, आमदार, भाजप

Web Title: Many in love with the old one-member ward system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.