परवडणाऱ्या घरांसाठी शहरात अनेक पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:02 AM2021-07-04T04:02:01+5:302021-07-04T04:02:01+5:30

औरंगाबाद : जमिनीचे दर गगनाला भिडलेले असतानाही शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना परवडणारी किफायतशीर किमतीतील घरे बांधून देत आहेत. ...

Many options in the city for affordable housing | परवडणाऱ्या घरांसाठी शहरात अनेक पर्याय

परवडणाऱ्या घरांसाठी शहरात अनेक पर्याय

googlenewsNext

औरंगाबाद : जमिनीचे दर गगनाला भिडलेले असतानाही शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना परवडणारी किफायतशीर किमतीतील घरे बांधून देत आहेत. शहराच्या आसपास अशा प्रकारचे १० पेक्षा अधिक भव्य गृहप्रकल्प उभारले जात आहेत,

शहरात मोठा वर्ग असा आहे की, तो अजूनही भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांची खूप इच्छा आहे की, स्वत:चे हक्काचे घर हवे आहे. मात्र, त्यांच्या कमी बजेटमध्ये. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे की, २०२२ पर्यंत सर्वांना हक्काची घरे मिळायला पाहिजे. या सर्वांचा विचार करून शहरातील काही नामांकित बांधकाम व्यावसायिक शेंद्रा, कुंभेफळ, बीड बायपास, वाळूज या भागात औद्योगिक वसाहतीजवळ १० ते १२ परवडणाऱ्या घरांचे भव्य प्रकल्प उभारत आहेत. प्रत्येक प्रकल्प हा १०० ते १५० युनिटचा आहे. सुमारे दीड हजार घरे यातून उपलब्ध होत आहेत. यात वन बीएचके फ्लॅट व वन आर. के. रोहाऊस असे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

(रविवार रिअल इस्टेट पुरवणीसाठी मॅटर )

Web Title: Many options in the city for affordable housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.