मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:02 AM2021-07-03T04:02:16+5:302021-07-03T04:02:16+5:30
औरंगबााद : मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांच्या विभागस्तरीय आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे ...
औरंगबााद : मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांच्या विभागस्तरीय आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षांच्या माध्यमातून मराठ्यांचा समावेश ओबीसीत करण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, वीर भागतसिंग विद्यार्थी परिषद व इतर कक्षांची आढावा बैठक संघाच्या केंद्रीय समितीच्या उपस्थितीत जिजाऊ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय कार्यकारिणी निरीक्षक म्हणून संवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, विभागीय उपाध्यक्ष डॉ. रामकिशन पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, परिषदेचे संघटक व्यंकटराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी संघाच्या विविध कक्षांच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याशिवाय संभाजी ब्रिगेडला सत्तेत आणण्यासाठी मराठा सेवा संघ आणि ३३ कक्ष मदत करतील, असेही बैठकीत ठरविण्यात आले. मराठा सेवा संघ व सर्व कक्षाचे पुनर्गठन व संघटन उभारणीवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले. शेवटी स्वप्निल घुंबरे यांचे राजर्षी शाहू महाराजांवर व्याख्यान झाले. सूत्रसंचालन विभागीय सचिव प्रा. दीपक पवार यांनी केले. आभार विभागीय कार्याध्यक्ष दत्तात्रय चन्ने यांनी मानले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांच्या नियुक्तीपत्रे देण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, डॉ. सुभाष बागल, ॲड. वैशाली कडू, नितीन भोसले, ॲड. वैशाली डोळस, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर अंभोरे, एम. एम. खुटे, डॉ. श्रीकांत पाटील, दीपक जाधव, डॉ. सुनील टाक, डॉ. गहिनीनाथ वळेकर, संजय मगर, सुभाष जाधव, कडुबा काळे, कारभारी नवघरे, दशरथ खराद आदी उपस्थित होते.