मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान

By संतोष हिरेमठ | Published: May 14, 2023 01:17 PM2023-05-14T13:17:40+5:302023-05-14T13:24:08+5:30

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती.

Maratha community should get sustainable reservation within 6 months; Statement by Minister Tanaji Sawant | मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान

मराठा समाजाला ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे; मंत्री तानाजी सावंत यांचं विधान

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आगामी ६ महिन्यात टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे. हे आरक्षण कशातून द्यायचे हे शासनाने आणि न्यायालयाने ठरवावे, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले.

डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कळकळीने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले. मात्र मागच्या सरकारने हे आरक्षण घालवले.  मागच्या सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयात तारखा सुरू असताना यांचा वकील देखील हजर राहत नव्हता. त्यामुळे आम्ही आता हे आवाहन करतो की सरकारच्या वतीने येथे सहा महिन्यात समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करणारी येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले

Web Title: Maratha community should get sustainable reservation within 6 months; Statement by Minister Tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.