Maratha Kranti Morcha : विष प्यायलेल्या मराठा आंदोलकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:41 AM2018-07-25T10:41:21+5:302018-07-25T10:55:54+5:30
औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलनादरम्यान आंदोलकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चानं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मराठवाड्यात हिंसक वळण लागले होते. यादरम्यान, जगन्नाथ सोनावणे (वय 55 वर्ष) या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलनादरम्यान सोनावणे यांनी लासूर टी पॉइंटवर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (24 जुलै) सकाळी 10.30 वाजता घडली. यानंतर तातडीनं जगन्नाथ यांना देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी सहा आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
( Mumbai Bandh: ठाण्यात 'रेल रोको', शेकडो मराठा आंदोलक ट्रॅकवर )
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (23 जुलै) कायगाव टोका येथे आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (24 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली. दरम्यान, बंदला जिल्ह्यात हिंसक वळण मिळाले. कन्नड तालुक्यात एका तरुणाने नदी पात्रात उडी मारली, तर एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शहर व परिसरात वाहनांचे दोन शोरूम तसेच पाच रिक्षांवर दगडफेकीचे प्रकार घडले. खासदार खैरे, आमदार झांबड यांना धक्काबुक्की झाली, तर क्रांतीचौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ यांनाही पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला.
Maharashtra: Jagannath Sonavne, a protester who attempted suicide by consuming poison yesterday in Aurangabad's Deogaon Rangari, dies in a hospital. He was a protester in the agitation for reservation for Maratha community in govt jobs & education.
— ANI (@ANI) July 25, 2018