आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:01 AM2017-10-19T04:01:57+5:302017-10-19T04:02:06+5:30
मराठा समाजाने ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे
औरंगाबाद : मराठा समाजाने ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारने समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी शहागंज येथील गांधी पुतळा येथे दिवसभर सत्यागृह आणि त्यानंतर २९ आॅक्टोबर रोजी मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात आगामी काळातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नावाने राज्यभरात शांततामय मार्गाने ५८ मोर्चे काढले. या मोर्चातून मराठा आरक्षण, स्वामीनाथन आयोग, अॅट्रॉसिटीचा होणारा दुरुपयोग, शेतकरी कर्जमाफी, केजी ते पीजी मोफत शिक्षण, कोपर्डी प्रकरण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या विषयावर केवळ तोंडी आश्वासनेच दिली आहेत. यामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी असून, कधीही संतापाचा उद्रेक होऊ शकतो.
याचा अंदाज आल्यामुळे मुख्यमंत्री व राज्य सरकार हादरले असून, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहात आहे. याविरोधात आता मराठा समाज राज्यभर आंदोलन करणार आहे. याची सुुरुवात औरंगाबादेतून होणार आहे.