मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम
By बापू सोळुंके | Published: March 16, 2023 06:00 PM2023-03-16T18:00:19+5:302023-03-16T18:02:58+5:30
निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत.
छत्रपती संभाजीनगर: शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या निर्णयाच्या समर्थनात मराठा मावळा संघटनेच्यावतीने टी.व्ही.सेंटर येथे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाचे समर्थन करणारे पत्र २६ मार्चपर्यंत भरून घेण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आाला.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय गत महिन्यात केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत. यांतर्गत गुरूवारी सकाळी मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टी.व्ही. सेंटर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जयभवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाला पाठिंबा देणारे पत्र मोहीम राबविण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे तीन हजार नागरीकांची पाठींबा पत्रे भरून घेण्यात आली. २५ मार्चपर्यंत हे पत्रे भरून घेण्यात येतील आणि त्याच दिवशी सर्व पत्रे एकत्रित विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव कदम , मराठावाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील, शहरजिल्हाध्यक्ष भरत कदम ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड ,शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथ शिंदे, उपजिल्हाध्यक्ष शुभम देशमुख,राहुल मते , गणेश चौधरी पाटील,सुनील निकम ,आशिष काळे ,मंगेश डक , आकाश जैस्वाल,रमेश खेडकर ,भिकन ओपळकर, सुभाष मुरमुडे, भानुदास पाटील, दिपक नारळे,तानाजी कऱ्हाळे, लक्ष्मण तेले पाटील, गणेश गावंडे, सुदाम पवार आदींची उपस्थिती होती.