मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:36 AM2023-09-26T08:36:43+5:302023-09-26T08:37:13+5:30

दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Maratha reservation: 65 lakh records searched, nothing in hand | मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होण्यासाठी कुणबी नोंद असलेल्या अभिलेखांचा शोध मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आजवर ६५ लाख अभिलेख तपासण्यात आले, त्यातून हाती काहीही लागलेले नाही. ब्रिटिश काळातील जनगणना, निजाम राजवटीतील पुरावेदेखील सापडले नाहीत. पाच हजारांपर्यंतच्या दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पाच हजार कुणबी नोंदी 
आजवर तपासलेल्या ६५ लाख अभिलेखांमध्ये सुमारे ५ हजार नोंदी आढळल्या आहेत. सध्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा, खासरापत्र, चारसालपत्र, तपासणीचे काम सध्या सुरू आहे.

काय दिसले, काय नाही?

n ८० लाखांहून अधिक अभिलेखांची होणार तपासणी 
n मराठवाड्यात १९०१ ते १९३१ पर्यंत झालेल्या जनगणनेचे रेकॉर्ड सापडत नाही.
n निजाम काळातील प्रशासकीय पुरावे सापडत नाहीत. ३६ ते ४० टक्के नोंदी याच काळातील होत्या.
n १०० वर्षे जुने दस्त शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. 
n १९३० पासूनच्या तुरुंगातील नोंदी तपासण्यासाठी तयारी केली आहे. 
n हैदराबादेतही रेकॉर्ड सापडले नाहीत.  

 

Web Title: Maratha reservation: 65 lakh records searched, nothing in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.