मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:00 PM2018-04-04T17:00:09+5:302018-04-04T17:02:32+5:30

मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे.

Marathwada Development Board Joint Director General post vacant | मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच

मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे. मुगळीकर यांची मनपातून १६ मार्च रोजी बदली झाली. बदली होऊन १८ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु ते अजूनही रजेवर असल्याने मंडळाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून करून घेतले जात आहे.

मराठवाडा विकास मंडळात सध्या फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम शिल्लक राहिले आहे. निधी नाही, अधिकार कागदावरच असल्यामुळे मुगळीकरांना त्या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अद्यापपर्यंत पदभार घेतला नसल्याचे दिसते.  या महिनाअखेरीस किंवा पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचे संकेत आहेत. त्या बदल्यांमध्ये मुगळीकर यांची मर्जीतील पदावर वर्णी लागण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालयातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी या पदांवरही शासन अधिकारी नियुक्त करण्याचे अपेक्षित आहे. 

मंडळाची धुरा प्रभारींवर 
मंडळावर प्रभारी अध्यक्षांची निवड करण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. अर्थतज्ज्ञ आर. पी. कुरुलकर यांच्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, संजीव जायस्वाल, उमाकांत दांगट यांनी अध्यक्षपद सांभाळले. सध्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. मंडळाच्या अप्पर आयुक्त आणि सदस्य सचिवपदाचा कारभारही प्रभारींकडेच देण्यात आला आहे. २०१२ नंतर मंडळाला पूर्णवेळ सदस्य सचिव मिळू शकला नाही. मंडळात मोजकेच कर्मचारी आहेत; परंतु त्यांच्याकडे कामच नाही.  सहसंचालक जयप्रकाश महारणवर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या पदावर प्रभारी अधिकारीच आहेत. प्रशासकीय, संशोधन, सहायक लेखाधिकारी, लघुलेखक, लिपिक आणि शिपाई पदे रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, लाईट बिल खर्च लाखो रुपये आहे.

मुगळीकर म्हणाले...
१६ मार्च रोजी मनपातून बदली झाल्यानंतर विकास मंडळ सहसंचालकपदाचा पदभार का घेतला नाही, याबाबत डी.एम. मुगळीकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, येत्या दोन-चार दिवसांत पदभार घेईल. सध्या रजेवर आहे. त्यामुळे पदभार घेतला नाही. 
 

Web Title: Marathwada Development Board Joint Director General post vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.