सुकाणू समितीच्या आंदोलनाने मराठवाडा जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:51 PM2017-08-14T12:51:07+5:302017-08-14T13:56:52+5:30

ऑनलाईन लोकमत  औरंगाबाद, दि. १४  : शेतक-याला कोणतीही अट न लावता थकित व सरसकट कर्ज माफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची ...

Marathwada jam by the movement of steering committee | सुकाणू समितीच्या आंदोलनाने मराठवाडा जाम

सुकाणू समितीच्या आंदोलनाने मराठवाडा जाम

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १४  : शेतक-याला कोणतीही अट न लावता थकित व सरसकट कर्ज माफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागु करावी, शेतक-याला रोहित्र द्यावेत ,शेती मालाला हमी भाव द्यावा या सह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासूनच शेतकरी सुकाणू समिती व विविध संघटनांनी संपूर्ण मराठवाड्यात चक्काजाम केले.  

परभणी :  शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले़ बैलगाड्यांसह सहभागी झालेल्या शेतकºयांनी रस्ते रोखून धरल्याने जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली होती़
राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, आॅनलाईन अर्ज करण्याची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली़ परभणी तालुक्यात परभणी-गंगाखेड या रस्त्यावर पोखर्णी फाटा, ब्राह्मणगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले़ परभणी-वसमत रस्त्यावर खानापूर फाटा येथे, परभणी- जिंतूर रस्त्यावर टाकळी तर परभणी-पाथरी रस्त्यावर पेडगाव या ठिकाणी शेतकºयांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले़ त्याच प्रमाणे सोनपेठ येथील मुख्य चौकात, गंगाखेड येथे नांदेड-पुणे राज्य मार्गावर, पालम-गंगाखेड मार्गावर सकाळपासून चक्काजाम आंदोलन केले़ त्यामुळे जिल्हाभरातील वाहतूक ठप्प झाली होती़ सुमारे दोन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे़ आंदोलना दरम्यान, शेतकºयांनी शासन विरोधी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला़

गंगाखेड -

पाथरी - 

सोनपेठ - 

टाकळी- 

बीड :  परळी - बीड मार्गावर तेलगाव येथे व  गेवराई - बीड या महामार्गावर पाडळसिंगि येथे शेतक-यांचा रास्ता रोको सुरु. 

गेवराई - गेवराई तालुका सुकानु समिती च्या वतीने सोमवार रोजी सकाळी शेतक-याच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील जातेगांव फाटा , सिरसदेवी, चकलांबा फाटा,पाडळसिंग, मादळमोही, कोळगावं येथे रस्ता रोको करण्यात आला यावेळी अनेक शेतकरी सह महिला उपस्थित होत्या. 

शेतक-याला कोणतीही अट न लावता थकित व सरसकट कर्ज माफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागु करावी, शेतक-याला रोहित्र द्यावेत ,शेती मालाला हमी भाव द्यावा ,सह विविध मागण्यांसाठी सोमवार रोजी सकाळी गेवराई तालुका सुकानु समितीच्या वतीने तालुक्यातील गढी माजलगावं रोड वरिल जातेगांव फाटा ,पाडळसिंग, चकलांबा फाटा,कोळगावं, सिरसदेवी फाटा सह विविध ठिकाणी शेतकरी व महिलानी अर्धा तास काही ठिकाणी एक तास रस्ता रोको केला.त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजलगाव - 


धारूर - 

हिंगोली :  सकाळी ११.३० वाजता शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने हिंगोली शहरालगतच्या अकोला बायपास व नांदेडनाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काहीवेळ वाहतूक ठप्प होती. पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

नांदेड :  मालेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानीने रास्ता रोको आंदोलन केले. सातबारा कोरा करावा या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनात स्थानीक शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. रास्ता रोको मुळे नांदेड परभणी दरम्यानची वाहतूक बराच काळ बंद होती. 

लातूर : रेणापूर -

चाकूर - 

Web Title: Marathwada jam by the movement of steering committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.