महाराष्ट्राच्या संघात मराठवाड्याचे खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:37 AM2019-02-19T00:37:03+5:302019-02-19T00:39:59+5:30
रायपूर येथे २0 ते १ मार्चदरम्यान होणाऱ्या सिनिअर महिलांच्या टी २0 साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या संघात मराठवाड्याच्या चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद येथील प्रियंका गारखेडे, श्वेता माने, जालना येथील माधुरी आघाव आणि बीड येथील मुक्ता मगरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
औरंगाबाद : रायपूर येथे २0 ते १ मार्चदरम्यान होणाऱ्या सिनिअर महिलांच्या टी २0 साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या संघात मराठवाड्याच्या चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद येथील प्रियंका गारखेडे, श्वेता माने, जालना येथील माधुरी आघाव आणि बीड येथील मुक्ता मगरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची सलामीची लढत २0 फेब्रुवारी रोजी गुजरात, २१ रोजी आसाम, २३ रोजी छत्तीसगड, २४ फेब्रुवारी रोजी नागालँड, २७ रोजी हरियाणा आणि १ मार्च रोजी सिक्कीम संघाविरुद्ध होत आहे. महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद अनुजा पाटील भूषवणार आहे.
महाराष्ट्राचा सिनिअर महिला संघ : अनुजा पाटील (कर्णधार), श्वेता माने, तेजल सबनीस, मुक्ता मगरे, शिवाली शिंदे, उत्कृर्षा पवार, माया सोनवणे, श्रद्धा पोखरकर, सायली लोणकर, प्रियंका गारखेडे, देविका वैद्य, माधुरी आघाव, चार्मी गवई, किरण नवगिरे, पूनम खेमनार.
या संघाला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वूमन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.