मराठवाड्यात जूनपर्यंत दुष्काळाशी सामना करण्यासाठी १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:13 PM2019-03-26T19:13:29+5:302019-03-26T19:17:31+5:30

मराठवाड्यातील सर्व मोठ्या जल प्रकल्पांत सध्या ४ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे.

In the Marathwada scarcity project, a draft of Rs 157 crore has been prepared to face the drought still June | मराठवाड्यात जूनपर्यंत दुष्काळाशी सामना करण्यासाठी १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार

मराठवाड्यात जूनपर्यंत दुष्काळाशी सामना करण्यासाठी १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ हजार ७७० योजनांचा समावेश पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक खर्च

औरंगाबाद : जून महिन्यापर्यंत १५७ कोटींचा टंचाई कृती आराखडा विभागीय प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर केला आहे. जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांत आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनअखेरपर्यंत विभागातील संभाव्य पाणीटंचाई व उपाययोजनांसाठी १५७ कोटींच्या आसपास रक्कम लागणार असून, त्यामध्ये १३ हजार ७७० योजनांच्या खर्चाचा विचार करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील सर्व मोठ्या जल प्रकल्पांत सध्या ४ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. २ हजारांच्या जवळ टँकरचा आकडा चालला आहे. ३० लाख नागरिकांना टँकरचे पाणी पुरविले जात आहे. एप्रिल महिन्यात टँकर आणि नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विंधन विहीर, कूपनलिका, प्रादेशिक नळ योजनांची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती मोहीम, पूरक नळ योजना, टँकर पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, गाळ काढणे, बुडक्या घेण्यासारख्या योजनांचा कृती आराखड्यात समावेश आहे. 

गाळ काढण्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विहिरींच्या अधिग्रहणासाठी ४८ कोटींच्या आसपास खर्च होईल. विभागात सद्य:स्थितीत पाणीपुरवठा योजनांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे टँकर, बैलगाडी आणि विंधन विहिरींवरच मराठवाड्यातील पाणी प्रश्न आणि टंचाई हाताळावी लागणार आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर अंदाजे दीड कोटी रुपये इतकी रक्कम लागेल. विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी २२ लाख, तर प्रादेशिक  नळ योजनांची विशेष दुरुस्ती मोहीम राबविण्यासाठी २ कोटींचा खर्च प्रशासनाने गृहीत धरला आहे. विंधन विहिरी आणि कूपनलिकांसाठी सव्वादोन कोटींच्या आसपास खर्च लागेल, असे प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 

टँकरवर १०० कोटींचा होणार चुराडा
पुढील तीन महिन्यांत टँकरच्या पाणीपुरवठ्यावर सुमारे १०० कोटींच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत ९४ कोटींच्या आसपास खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला आहे. यामध्ये योजनांसह गाव आणि वाड्यांचा खर्च अपेक्षित आहे. 

पुढील तीन महिन्यांतील संभाव्य खर्च 
जिल्हा           योजना    खर्च (लाखांत)

औरंगाबाद        १९२    ३४२ 
जालना           १५८३    २०९९
बीड                ३५२०    ६०९६
परभणी          १४०६    १३३७
हिंगोली          ११४३    ७८३
नांदेड             १९७३    १७३६
उस्मानाबाद   १९५६    १८१९
लातूर            १९९७    १५३८
एकूण          १३७७०    १५७५३

Web Title: In the Marathwada scarcity project, a draft of Rs 157 crore has been prepared to face the drought still June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.