टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:01 PM2024-03-26T17:01:05+5:302024-03-26T17:03:59+5:30

मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पात फक्त २३ टक्के पाणी

Marathwada towards Tankerwada; Tanker 600 plus by the end of March | टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार

टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्च अखेरीस विभागातील पाच जिल्ह्यांतील ३९९ गावे आणि ९१ वाड्यांना ६०६ टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा होत असून एप्रिल आणि मे महिन्यांत आणखी परिस्थिती बिकट होणार आहे.
मराठवाड्याची--- छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरचा आकडा सध्या आहे. त्या खालोखाल जालना शहराचा क्रमांक आहे. या दोन जिल्ह्यांत ५६५ टँकरने पाणीपुरवठा होत असून पुढील दोन महिन्यांत १ हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती आहे.

विभागात २०२३ साली पाऊस समाधानकारक झाला नाही. १५ टक्के पावसाची तूट राहिली. परिणामी मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात झाला. विभागात सध्या फक्त २३.६९ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात २३ टक्के पाणीसाठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के पाणी धरणात होते. टँकरसाठी ३३२ तर त्याव्यतिरिक्त ५७० अशा ९०२ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे.

३९९ गावे, ९१ वाड्या तहानल्या
मराठवाड्यातील ४०० गावे आणि ९१ वाड्या तहानल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये २३० गावे ४२ वाड्या, जालन्यात १३५ गावे, ४८ वाड्या, बीडमध्ये १६ गावे, लातूरमध्ये १ तर धाराशिव जिल्ह्यात १८ गावे तहानली आहेत.

टंचाई आराखड्यासाठी नियोजन
विभागातील मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांसाठी टंचाई आराखड्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या तीन महिन्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात असून जून अखेरपर्यंत टंचाईचे नियोजन करण्यासाठी २०० कोटींहून अधिकची मागणी प्रशासन करण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात २३ टक्के पाणी
मोठे प्रकल्प ...११ ..... २९.०५
मध्यम प्रकल्प... ७६ .....१२.४३
लघु प्रकल्प.... ७४९........१२.९२
गोदावरीवरील बांधारे... १५ .....२६.८३
तेरणा, मांजरा नदीवरील बंधारे ....२७..... १७.६९
एकूण प्रकल्प..... ८७७...... २३.६९

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर
जिल्हा....................टँकर

छत्रपती संभाजीनगर...३४८
जालना...२१७
बीड...११
लातूर....१
धाराशिव....२९
एकूण....६०६

Web Title: Marathwada towards Tankerwada; Tanker 600 plus by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.