‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:38 AM2017-12-27T00:38:16+5:302017-12-27T00:38:20+5:30

भानुदास चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेरीला ८ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

 'Marathwada's young man' 8 | ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ८ पासून

‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ८ पासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भानुदास चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेरीला ८ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या पहिल्या तीन स्पर्धकांची महाअंतिम फेरी औरंगाबादमध्ये १५ जानेवारी रोजी देवगिरी महाविद्यालयात होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा, त्यांचे विचार खुलेपणाने मांडता यावेत, त्यातून युवावक्ते घडावेत यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने गेल्या सात वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे चव्हाण म्हणाले.स्पर्धेची प्राथमिक फेरी औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालय, जालन्यात जेईएस महाविद्यालय, परभणीमध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, हिंगोलीत राजेसंभाजी कनिष्ठ महाविद्यालय, नांदेडमध्ये सायन्स कॉलेज, लातूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय, उस्मानाबादमध्ये तेरणा महाविद्यालय आणि बीडमध्ये बलभीम महाविद्यालय या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे.
स्पर्धा मराठवाड्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असून, एका महाविद्यालयातून केवळ तीन विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल.प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक असून, महाअंतिम फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार, पंधरा हजार आणि अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
आॅनलाईन कर्जमाफी, आॅफलाईन बळीराजा ४ऐसे कैसे झाले, भोंदू कर्म करूनी म्हणती साधू ४क्रिकेटच्या ‘फ्री हिट’मुळे इतर खेळांचे मरण ४हा रस्ता अटळ आहे...!
महाअंतिम फेरीसाठी विषय
४सरकारी जाहिराती... कोण खरा लाभार्थी? ४समताधिष्ठित राजकारणाचे पुरस्कर्ते - शरद पवार ४जीएसटी : काय घडलं काय बिघडलं! ४स्वयंघोषित सेन्सॉरशिपच्या कात्रीत रूपेरी पडदा.

Web Title:  'Marathwada's young man' 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.