मार्जिन मनी योजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:06+5:302021-06-16T04:05:06+5:30

औरंगाबाद : शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. ...

Margin Money Scheme launched | मार्जिन मनी योजना सुरू

मार्जिन मनी योजना सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. योजनेसाठी इच्छुकांनी जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू

औरंगाबाद : रब्बी हंगामामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य मका १८५० प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याबाबत निर्णय झाला आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची भरडधान्य खरेदी सुरू करण्यात आली आहे. (करमाड), गंगापूर, लासूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, फुलंब्री या खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे.

मदत योजनेच्या लाभासाठी आवाहन

औरंगाबाद : ऑटोरिक्षा परवानाधारकांनी शासनाच्या आर्थिकसाह्य योजनेच्या लाभासाठी वाहन परवाना, आधार क्रमांक नमूद करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Web Title: Margin Money Scheme launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.