दहा लाख रुपये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:02 AM2021-01-15T04:02:27+5:302021-01-15T04:02:27+5:30

========================= प्रवाशांनी मोबाईल पळविला औरंगाबाद : रिक्षामधील सहप्रवासी अनोळखी व्यक्तीने रिक्षाचालकाची नजर चुकवून त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना ११ ...

Marital harassment for a dowry of Rs 10 lakh | दहा लाख रुपये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

दहा लाख रुपये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

googlenewsNext

=========================

प्रवाशांनी मोबाईल पळविला

औरंगाबाद : रिक्षामधील सहप्रवासी अनोळखी व्यक्तीने रिक्षाचालकाची नजर चुकवून त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कटकट गेट येथे घडली. याविषयी विकास दत्ता लिमकर (रा. मुकुंदवाडी ) यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदवली.

=========================

पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण

औरंगाबाद : उसने दिलेले १० हजार रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या युसूफ मोहम्मद अली अन्सारी (२९, रा. प्रिया कॉलनी,पडेगाव) यांना त्यांचा मावसा शेख तनवीर याने लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री १० वाजता चांदमारी भागात घडली. युसूफ यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

=========================

नारेगावातून मोटरसायकल चोरी

औरंगाबाद : नारेगाव परिसरातील पटेल नगर येथे घरासमोर उभी मोटरसायकल (एम एच २० ईएन २४३९) चोरट्यांनी लंपास केली. ११ जानेवारी रोजी रात्री झालेल्या घटनेविषयी शेख समशेर शेख मुनीर यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

========================

महिलेला शिवीगाळ

औरंगाबाद : जुन्या संबंधातून ओळखीच्या महिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करून वेदांत नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जुनेद थापा मोहम्मद अली (रा. चाऊस कॉलनी ) असे आरोपीचे नाव आहे.

========================

संपत्तीच्या वादातून विनयभंग

औरंगाबाद : संपत्तीमध्ये हिस्सा देण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सिटीचौक ठाण्यात आरोपी अब्दुल्ला बिन अमर हिलाबी (रा. नवाबपुरा ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

==========================

Web Title: Marital harassment for a dowry of Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.