पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:16+5:302021-05-25T04:05:16+5:30
फातेमा रफीक शेख (२० रा. परभणी, ह.मु.पंढरपूर) या विवाहितेस तिचा पती रफीक शेख व त्याचे नातेवाईक सरकारी दवाखान्यात नोकरी ...
फातेमा रफीक शेख (२० रा. परभणी, ह.मु.पंढरपूर) या विवाहितेस तिचा पती रफीक शेख व त्याचे नातेवाईक सरकारी दवाखान्यात नोकरी लावण्यासाठी ५ लाखांची मागणी करुन छळ करीत होते. या छळानंतर फातेमा हिच्या वडिलांनी जावई रफीक यास ३० हजार रुपये आणून दिले. मात्र सासरच्या मंडळीकडून सतत छळ सुरु असल्याने फातेमा हिने सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून ५ जणांविरुध्द तक्रार दिली आहे.
--------------------------
बेशुद्ध पडलेल्या इसमाचा मृत्यू
वाळूज महानगर : तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ बेशुद्ध पडलेल्या ३५ वर्षीय इसमाचा शासकीय रुग्णालयात मृत्यूची झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. रवी शिवराज गंगाधरे (३५ रा. खवड्या डोंगर) असे मयताचे नाव आहे. येथील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ एक इसम बेशुद्ध पडलेला असल्याची माहिती सोमवारी सांयकाळी ४ वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्या इसमाचे नाव रवी गंगाधरे असल्याचे समजले. यानंतर रवीला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
---------------------------