वाळूजमध्ये जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:07+5:302021-05-27T04:04:07+5:30

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ज्या गावात पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळून आल्यास त्या गावात तीन दिवस जनता ...

Market curfew in the sand dries up the market | वाळूजमध्ये जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत शुकशुकाट

वाळूजमध्ये जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत शुकशुकाट

googlenewsNext

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ज्या गावात पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळून आल्यास त्या गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश स्थानिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. या आदेशावरुन सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी ए.सी.लव्हाळे, मंडळ अधिकारी सतीश भदाणे, तलाठी अशोक कळसकर यांनी जनजागृती करुन जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाची साथ आटोक्यात यावी, यासाठी व्यापाºयांनी या जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आपापले व्यवसाय व उद्योग बंद ठेवले होते. या जनता कर्फ्यूमुळे तीन दिवस संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन काळातील दुकानाचे भाडे, विज बिल, नोकराचे पगार तसेच घरखर्चासाठी पैसे कोठून आणावेत असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

फोटो ओळ

वाळूजला जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेत तीन दिवसांपासून असा शुकशुकाट जाणवत आहे.

Web Title: Market curfew in the sand dries up the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.